Nagpur Loksabha Election 
महाराष्ट्र

Nagpur Loksabha Election: नितीन गडकरींची हॅटट्रिक; काँग्रेसच्या ठाकरेंचा पराभव

Nagpur Loksabha Election: नागपूर मतदारसंघात काँग्रेसेच उमेदवार विकास ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या लढत होती. या लढतीत नितीन गडकरी यांनी विजय मिळवलाय.

Bharat Jadhav

नागपूर: भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाची हॅटट्रिक केलीय. मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत जाहीर झालेल्या १६ व्या फेरी अखेरीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ लाख ७ हजार मतांची आघाडी घेतली होती. गडकरींनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा पराभव केलाय.

नागपूर मतदारसंघात काँग्रेसेच उमेदवार विकास ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या लढत होती. लोकसभेत विजय मिळवल्यानंतर नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिलीय. नागपूरच्या मतदार बंधू-भगिनींचे मन:पूर्वक आभार! आपले प्रेम व आपला विश्वास यामुळेच हा विजय मिळालाय. नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहील. देशातील विकसित शहरांच्या यादीत नागपूरला स्थान मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आपले प्रेम व आपला विश्वास हीच माझी मोठी ताकद असल्याचं गडकरी म्हणालेत.

विकास ठाकरे यांना आपला विजय होईल, अशी खात्री होती मात्र मतदारराजांनी नितीन गडकरी यांच्या बाजुने कौल दिला. नागपूर लोकसभा मतदारसंघात एकंदर २६ उमेदवार रिंगणात होते, मात्र भाजप-काँग्रेस, अशी थेट लढत सुरू होती. तर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस उमेदवार ठाकरेंना पाठिंबा दिला होता. सकाळी ८ वाजता कळमना मतमोजणी केंद्रावर मत मोजणी सुरू झाली. तेव्हापासून नितीन गडकरी यांनी आपली मतांची आघाडी कायम ठेवली होती.

सहाव्या-सातव्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी गडकरींना सुमारे ७ हजाराच्या मतांनी मागे टाकले होते. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गडकरींना ६ लाख ११ हजार ६२६ मते प्राप्त झाली होती. काँग्रेसचे विकास ठाकरे यांना ४ लाख ७२ हजार ६२० मते आहेत. तब्बल १ लाख २८ हजार २९६ मतांच्या फरकाने गडकरींनी बाजी मारली.

दरम्यान गडकरींच्या या विजयामुळे येत्या काळात केंद्रातील त्यांचे स्थान आणखी भक्कम झाले आहे. नागपूरमधील या लढतीकडे अख्या देशाचं लक्ष लागलं होतं. गडकरींनी विजय मिळवत तिसऱ्यांदा दिल्ली गाठलीय. याआधी नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये मोदी लाटेत विजय मिळवला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत गडकरी यांनी काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचा २ लाख १६ हजार ००९ मतांनी पराभव केला होता.

नागपूरात किती टक्के मतदान झाले?

नागपुरमध्ये यंदा एकूण ५४.३३ टक्के मतदान झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघात २२ लाख २३ हजार २८१ मतदार आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात १२ लाख ०७ हजार ३४४ जणांनी मतदान केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kurdai Bhaji: थोडं तिखट, झणझणीत आणि घरगुती चवीचं काहीतरी खायचंय? मग ही मराठवाडा स्टाईल कुरडई भाजी होऊन जाऊदेत

Maharashtra Live News Update: कन्या सेरेना मस्कर हिने युथ एशियाई कबड्डी स्पर्धेत मिळवले गोल्ड मेडल

ISRO LVM3 Launch : भारताची ताकद वाढली, इस्रोची 'बाहुबली' झेप! LVM3 रॉकेटने रचला इतिहास |VIDEO

Ladki Bahin Yojana: वडील आणि पती दोघेही हयात नाहीत, लाडक्या बहिणींनी eKYC कशी करायची? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भयंकर! पोटच्या २ मुलांकडून आई वडिलांची हत्या; घरातच दोघांना संपवलं, कारण फक्त..

SCROLL FOR NEXT