saam tv
महाराष्ट्र

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष बैठकांचा धडका

Ravindra Chavan in Vidarbha: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. मतदार नोंदणी आणि संघटनात्मक तयारीला वेग देण्याची रणनीती आखण्यात आल्याचे वृत्त आहे.

Bharat Jadhav

भाजप सदैव निवडणुकांच्या मोडवर असते. पक्षातील कार्यकर्त्यांना सक्रीय ठेवत पक्षांची मोटबांधणी चालू असते. त्याची प्रचिती पुन्हा एकदा नागपुरात आली. नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण विदर्भाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या झंझावती दौऱ्यात संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपची संघटनात्मक यंत्रणा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.

या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर ग्रामीण (रामटेक), चंद्रपूर महानगर व ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर महानगर, काटोल आणि वर्धा या संघटनात्मक जिल्ह्यांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये संघटनात्मक बांधणी, निवडणूक नियोजन आणि कार्यपद्धतीचा आढावा घेत चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक लढवण्याचे मार्गदर्शन केले.

चंद्रपूरमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान ब्रह्मपुरी येथील, १९८० पासून पक्षकार्यासाठी समर्पित असणाऱ्या प्राध्यपक शेख सर यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. "प्राध्यापक शेख सर यांच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते हे भाजपा परिवाराचे खरे आधारस्तंभ आहेत. अशा निष्ठावंत ज्येष्ठांच्या संघर्षातूनच आज पक्षाचा हा भव्य वटवृक्ष साकार झाला आहे." असे यावेळी रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान रामटेकचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया, माजी आ. अतुल देशकर, ज्येष्ठ नेते किसन नागदेवे, माजी आ. कृष्णा गजभिये आणि आ. विनोद अग्रवाल यांच्या निवासस्थानी/कार्यालयाला सदिच्छा भेटी देत रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकज भोयर, प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, आ. संजय भेंडे, आ. प्रवीण दटके, आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया, आ. किशोर जोरगेवार, आ. करण देवतळे, आ. देवराव भोंगळे, आ. चैनसुख संचेती, आ. अरुण लखाणी, आ. परिणय फुके, आ. विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, आ. अविनाश ब्राह्मणकर यांच्यासह माजी खासदार हंसराज अहिर, सुनील मेंढे, माजी आमदार व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT