नागपूरचा कुख्यात गुंड सुमित ठाकूर हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. मकोका मध्ये जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रील बनवणे त्याला चांगलेच भोवले आहे. यानंतर पुन्हा त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली.
ऑक्टोबर 2023 मध्ये नागपूरमधील जरीपटका येथील थावरे कॉलनीत कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर आणि त्याच्या साथीदारांनी पिस्तुलच्या धाकावर तीन तरुणांचे अपहरण केले होते. या प्रकरणात सुमित ठाकूर आणि त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुमित ठाकूर हा तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता, परंतु त्याच्या रिहायशीनंतर तुरुंगाच्या बाहेर अनेक गुन्हेगार त्याला घेण्यासाठी पोहोचले होते. सुमित ठाकूर आणि त्याचे साथीदार गाड्यांच्या ताफ्यातून तुरुंगाच्या बाहेर निघाले. त्याच्या साथीदारांनी "बाप तो बाप रहेगा" या गाण्यावर आधारित एक रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, सुमित ठाकूरने सोशल मीडियावर रील तयार केल्या, ज्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची माहिती पुन्हा चर्चेत आली. या रीलच्या व्हायरल होण्यावरून, सुमित ठाकूरवर पोलीसांनी जामिनाच्या अटींचा भंग केल्यामुळे त्याचा जामिन रद्द केला आणि पुन्हा त्याची तुरुंगात रवानगी केली.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.