Nagpur  Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: मोठी बातमी! नागपुरातील रामन विज्ञान केंद्राला उडवून देण्याची धमकी

Nagpur News in Marathi: अयोध्येथील राम मंदिर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीचं वृत्त ताजे असताना रामन विज्ञान केंद्रालाही उडवून देण्याची धमकी आल्याची बाब समोर आली आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur News:

अयोध्येथील राम मंदिर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीचं वृत्त ताजे असताना रामन विज्ञान केंद्रालाही उडवून देण्याची धमकी आल्याची बाब समोर आली आहे. रामन विज्ञान केंद्राच्या अधिकृत जी-मेल आयडीवर धमकीचा ई-मेल आला होता. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी केंद्राची तपासणी करीत मेल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील रामन विज्ञान केंद्राला ५ जानेवारीला पहाटे साडेचार वाजता धमकीचा ईमेला आला. त्यानंतर केंद्राने तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. या ईमेलमध्ये रामन विज्ञान केंद्रातील गोदामात मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याचं सांगत फुटण्याचा उल्लेख त्यांनी केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या धमकीची माहिती नागपुरातील गणेशपेठ पोलिसांनी मिळताच त्यांनी रामन विज्ञान केंद्र गाठून संपूर्ण तपासणी केली. मात्र, त्यात गोदामात काहीच आढळून आले नसल्यानं पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. देशभरातील संग्रहालय आणि विज्ञान केंद्राना असे ई-मेल पाठवल्याचा संशय आहे.

देशात २२ जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदीराचे लोकार्पणाची तयारी सुरू असताना देशात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने काही संघटनांकडून प्रयत्न करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत केंद्रीय तपास यंत्रणेला मिळाल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, याच आशयाचे काही इमेल सर्वत्र आले असून मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याचीही माहिती आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.मात्र, या संपूर्ण प्रकरणात गुप्तता पाळण्याच आल्याचे समजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT