Murum Mafia Maharashtra Nagpur news Saam
महाराष्ट्र

धक्कादायक! नागपूरमध्ये तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं, ४ किमी फरफटत नेलं

Murum Mafia Maharashtra Nagpur news : नागपूरच्या कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदाराला जेसीबीला लटकवून ४ किमी फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

उपराजधानी नागपूरमध्ये एका तहसीलदाराला जेसीबीला लटकावून फरपटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुही येथे बेकायदा मुरूम उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेल्यानंतरही धक्कादायक घटना घडली आहे. बुद्धभूषण निळकाजे यांना वाळू माफिया आणि गुंडांनी मारहाण करत जेसीबीला लटकवल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. आरोपींनी बुद्धभूषण निळकाजे यांना जेसीबीला लटकवले अन् ४ किमी पर्यंत फरपटत नेहल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात नायब तहसीलदार बुद्धभूषण निळकाजे कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी तहसीलदारांना जेसीबीला लटकवत चार किलोमीटर पर्यंत नेले. मात्र पोलिसांचे वाहन दिसताच जेसीबी सोडून आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून जेसीबी ताब्यात घेतला आहे. कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात मुरूम माफियांनी महसूल पथकावर हल्ला चढवल्याच्या प्रकारानंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

५ मे रोजी मध्यरात्री ११:३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना चालत्या जेसीबीला लटकवून तब्बल ३ ते ४ किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं. तहसीलदाराला लटकवून दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

नागपूरमधील कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाची माहिती मिळताच नायब तहसीलदार निकाळजे यांनी पथकासह धाड टाकली होती. पण तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. घटनेचा माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कुही पोलिसांनी जेसीबी चालक मयूर थोटे याला बुधवारी अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉर्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी गोळ्या-औषधांऐवजी करा ही 6 योगासने, एकदम फिट राहाल

Pune BJP : पुण्यात भाजपचा 'ट्रिपल स्ट्रोक'! निवडणुका नसतानाही तिघांचा पक्षात प्रवेश

Heart Attack : महिलांनो! 'या' वयानंतर वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ३ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

भीषण अपघात! बस उलटल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; BKC आणि सूरत स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT