A person who went to Katol Police Station in Nagpur to file a complaint was allegedly beaten up by the police. saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: पोलिसांचा अजब न्याय! तक्रार देणाऱ्याच्याच कानफटीत मारली; कानाचा पडदाच फाटला

Nagpur Crime : नागपूरमधील काटोल पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तक्रारदाराला पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केली असून त्यामुळे फिर्यादीच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे.

Bharat Jadhav

  • एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या कानफटीत मारल्यामुळे त्याच्या कानाचा पडदा फाटला.

  • कटोल पोलीस स्टेशनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

  • पोलीस अधीक्षकांकडे पोलिसांची तक्रार केली आहे.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

अन्याय झाला म्हणून आपण न्याय मागण्यासाठी आपल्या हक्कासाठी पोलिसांकडे मदत मागतो. कायद्याचे रक्षक आपल्याला मदत करतील ,अशी आशा ठेवून त्यांच्याकडे दाद मागतो. नागपुरात मात्र शिवीगाळ करणाऱ्याविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीलाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तक्रार देणाऱ्या फिर्यादीच्या कानफटीत पोलिसांनी लागवली, त्यामुळे फिर्यादी व्यक्तीच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांच्या वर्तनाचा अजब प्रकार नागपूरमधील काटोल पोलीस स्टेशनमध्ये घडला आहे. कपिल रेवतकर असं फिर्यादीचे नाव आहे. कपिल रेवतकर खामगाव येथील रहिवासी आहेत. फिर्यादी कपिल रेवतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील रुपेश पवार नावाचा व्यक्ती दुचाकीवरून जात असताना कपिल रेवतकर यांच्याशी वाद घातला होता. काटोल मार्गावर या दोघांचा वाद झाला होता.

त्यानंतर कपिल रेवतकर रुपेश पवारविरोधात काटोल पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी 24 फेब्रुवारीला गेला. त्याचवेळी रुपेश पवार हा आधीच पोलीस स्टेशनला जाऊन बसला होता. यावेळी तक्रार देत असताना शाब्दिक वाद वाढला. कपिल रेवतकर कौटुंबीय बोलत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला मागून मारलं. या मारहाणीत रेवतकर यांच्या कानाचा पडदा फाटला. त्याला उपचारासाठी किमान आणखी तीन ते चार महिने लागणार आहेत.

दरम्यान २४ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी कपिल रेवतकर यांनी ६ मार्चला नागपूर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, त्यानंतर त्यांना आपली कैफियत मांडली. पाठीमागून मारणारा पोलीस कर्मचारी कोण होता हे कपिल यांना कळू शकले नाही. मात्र त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार कपिल रेवतकर यांनी दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून कारवाई करावी, अशी मागणी कपिल रेवतकर यांनी केली आहे.

कपिल रेवतकर सध्या भीतीच्या वातावरणात असून या सगळ्या संदर्भात पोलिसांनी रुपेश पवार या शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी तसेच मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा ,क्लस्टर योजना तातडीने राबवा; कल्याणमध्ये आंदोलकांची मागणी

Thane-Borivali Travel: ठाण्यावरून बोरीवलीला फक्त १५ मिनिटांत पोहचा, दुहेरी बोगदा ठरणार गेमचेंजर; काय आहेत वैशिष्ट्ये?

Jio Recharge: खुशखबर! जिओचा सर्वात स्वस्त ३१ दिवसांचा प्लान, किंमत ३४९ पेक्षा कमी; काय फायदे मिळणार?

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ₹६००० मिळणार; ४ महिन्याचे रखडलेले हप्ते एकत्र येणार? वाचा अपडेट

POD Taxi : मुंबईत लवकरच सुरू होणार 'पॉड टॅक्सी', वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; कुठून कुठे धावणार?

SCROLL FOR NEXT