Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : नागपुरात खळबळ; पोह्यांसोबत खर्रा न दिल्यावरून भांडण, मारहाणीत युवकाचा मृत्यू

Nagpur News : आर्यन वहिले या युवकाने सोबतच काम करणाऱ्यांना खर्रा मागितला. मात्र त्यांनी खर्रा देण्यास नकार दिला. यामुळे त्यांच्या वाद निर्माण होतुं भांडण झाले. या भांडणात प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: नागपूरमध्ये नागपुरी तर्री- पोहे फेमस आहेत. इतकेच नाही तर यासोबत नागपुरी खर्रा प्रसिद्ध आहे. तर्री पोहे खाण्यासाठी आलेल्या एकाला खर्रा न देण्यावरून त्याने वाद घातला. या वादातून प्रकरण मारामारीपर्यंत पोहचले. दरम्यान मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी एकाचा मृत्यू झाल्याची घटना अजनी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. 

नागपूरातील अजनी पोलिस स्टेशन हद्दीतमध्ये सदर घटना घडली आहे. या घटनेत  आर्यन वहिले असे मृत तरुणाचे नाव आहे. तर राहूल हजारे आणि नागेश मेश्राम असे मारहाण करणाऱ्या दोघांचे नाव आहे. दरम्यान सदर घटनेत आर्यन वहिले या युवकाने सोबतच काम करणाऱ्यांना खर्रा मागितला. मात्र त्यांनी खर्रा देण्यास नकार दिला. यामुळे त्यांच्या वाद निर्माण होतुं भांडण झाले. या भांडणात प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले होते. 

काही तासातच झाला मृत्यू 

दरम्यान राहुल आणि नागेश यांनी आर्यन यास मारहाण केली. हातातील कड्याने डोक्याला मारले. यात डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दोन दिवसांनी त्याला त्रास जाणवू लागला. अर्थात घटनेच्या दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडली. यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू होताच काही तासात त्याचा मृत्यू झाला.

दोघांना घेतले ताब्यात 
याप्रकरणी आर्यनचे वडील विलास वहिले यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणात चोकशी करत दोघे संशयित आरोपी राहुल आणि नागेश या अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT