nagpur crime news
nagpur crime news  saam tv
महाराष्ट्र

Crime News | नागपुरात खळबळ! शहरात व्यक्तीची धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हत्या

मंगेश मोहिते

नागपूर : नागपुरातून (Nagpur) धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरात पुन्हा एकदा दिवसाढिवळ्या हत्येची घटना घडली आहे. रस्त्याच्या अगदी मध्यस्थानी एका व्यक्तीची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशन आणि गुन्हेशाखा कार्यालयाच्या काही अंतरावर ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (Nagpur Crime News )

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावर सकाळी मृतक नारायण गयाप्रसाद द्विवेदी हे दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला (Attack) केला. आरोपींनी नारायण द्विवेदी यांच्यावर अनेक वार केल्याने ते दुचाकीसह रस्त्यावरचं कोसळले,त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाले. जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाचा मोबाईलवर फोटो काढून तो मित्राला पाठवला. त्यांनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नारायण द्विवेदी हे सुरेंद्रगड वस्तीत भाड्याने राहत होते. मात्र,घर मालकाच्या मुलाचे वर्तन योग्य नसल्याने त्यांनी ती खोली रिकामी करून दुसऱ्या भागात राहण्यास गेले होते. त्या वादातून नारायण द्विवेदी यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

SCROLL FOR NEXT