Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी; सोशल मीडियावरील मित्राचे कृत्य

Nagpur News : मैत्रीचा फायदा घेत समर्थने वेगवेगळे कारणं देत पैश्याची मागणी केली. ३५ हजार दिल्यानंतर समर्थ महिलेला पैसे मागतच राहिला

Rajesh Sonwane

पराग ढोबळे, नागपूर 
नागपूर
: सोशल मीडियातून मैत्री झाल्यानंतर त्यातून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार नागपूरमध्ये घडला असून मैत्रिणीला व्हिडीओ व्हायरल कारण्याची धमकी देत सोशल मीडियावरील मित्राकडून खंडणी मागण्यात आली होती. खंडणी मागणाऱ्याला बजाज नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

महाल परिसरात राहणाऱ्या समर्थ भोसले नामक असे संशयिताचे नाव (Nagpur) आहे. समर्थ याची एका महिलेसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. या माध्यमातून हळूहळू बोलणं सुरू झालं. यातून आणखी मैत्री घट्ट झाली. त्या मैत्रीचा फायदा घेत समर्थने वेगवेगळे कारणं देत पैश्याची मागणी केली. ३५ हजार दिल्यानंतर समर्थ महिलेला पैसे मागतच राहिला. त्यामुळे महिलेने त्याच्याशी बोलणं बंद केले. यात महिलेने बोलणं बंद केल्याने समर्थने तिच्या फोटोचा फेक व्हिडिओ व्हायरल करण्याची (Crime News) धमकी दिली. तोच प्रकार पाहता महिलेने बजाज नगर पोलिसात तक्रार नोंदवली.

संशयिताला घेतले ताब्यात 
यानंतर बजाजनगर पोलिसांनी (Nagpur Police) प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित तरुणाचा शोध घेतला. यानंतर त्याला अटक करत त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. यावेळी बजाजनगर पोलिसांनी समर्थ भोसले याची पार्श्वभूमी तपासली असता त्याच्यावर यापूर्वीही वेगवेगळे तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Tourism: सोलापूरजवळ वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन; लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं

Maratha Reservation Controversy: हा जीआर फक्त कागद; मराठा आरक्षणावर विनोद पाटील यांची जोरदार टीका|VIDEO

Shocking : धक्कादायक! गुंडांनी चोर समजून बंधक ठेवलं; ३ दिवस अमानुष छळ, गुप्तांगात पेट्रोल ओतलं

Maharashtra Live News Update: ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

Bus Accident : शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बसउलटली; ३० विद्यार्थी जखमी, तीन जण गंभीर

SCROLL FOR NEXT