Nagpur Police Station मंगेश मोहिते
महाराष्ट्र

Nagpur Crime News : एकदाच मोठी गुंतवणूक करा आणि तिप्पट नफा मिळवा; खोटं आमिष दाखवत लाखोंचा गंडा

कुराणी दाम्पत्याने कोलार यांच्यासह अन्य चार जणांकडून तब्बल ६५ लाखांची लूट केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Crime News : राज्यात सातत्याने चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. शेअर मार्केट, रिअल इस्टेट अशा ठिकाणी पैसे गुंतवल्यास जास्तीत जास्त लवकर आणि दुप्पट नफा मिळवता येतो असा अनेकांचा समज आहे. मात्र ही गोष्ट नागपूमधील कोलार दाम्पत्याला चांगलीच महागात पडली आहे. (Latest Nagpur Crime News)

आपल्या ओळखीच्या एका मित्राकडे त्यांनी ४१ लाखांची गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटसमध्ये हे पैस टाकून तिप्पट नफा मिळेल असे आमिष या दाम्पत्याला दाखवण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत त्यांना कोणतीही दुप्पट रक्कम मिळाली नाही आणि पैसे देखील परत केले गेले नाहीत. त्यामुळे या दांम्पत्याने आता पोलिसांत धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुराणी दाम्पत्याने कोलार यांच्यासह अन्य चार जणांकडून तब्बल ६५ लाखांची लूट केली आहे. हे दोघे पती पत्नी शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमध्ये असल्याचे सांगायचे आणि तिप्पट नफा मिळेल असे आमिष दाखवत होते. त्यामुळे पाच कुटुंब यामध्ये फसले गेले.

२६ फेब्रुवारी २०१८ ते १२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान चौघांनी कुराणीकडे ६५ लाख रुपये दिले. अशात दीड वर्षांपूर्वी कुराणी यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर आता या सर्व पैशांची चौकशी त्यांच्या पत्नीकडून केली जात आहे. नागपूर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganewadi Jatra: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी गाव आहे तरी कुठे? यात्रेची खास परंपरा

BMC Election: दुबार-तिबार नाही, तर ४ मतदारांची १०३ वेळा नावं, मतदारयादीतला सर्वात मोठा घोळ उघड

Methi Pulao Recipe: टिफिनसाठी पालेभाज्या-चपातीचा कंटाळा आला? ट्राय करा मेथीचा झणझणीत पुलाव, एकदा रेसिपी वाचाच

टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; धाकड ऑलराउंडरचं कमबॅक, शुभमन गिलबाबत घेतला मोठा निर्णय

५६ वर्षांच्या नराधमाकडून ६ वर्षीय मुलीवर शाळेच्या आवारात अत्याचार; अमरावतीमधील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT