Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : घरफोडी करणाऱ्या टोळीतील पाच जण ताब्यात; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Nagpur News : चोरी केलेले साहित्य विकून यातून मिळणाऱ्या रकमेतील पैस आपापसात वाटून घेत होते. हे प्रकार वाढल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरफोड्या केल्या जात होत्या. घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाली होती. (Nagpur) पोलिसांकडून यांचा शोध सुरु असताना पोलिसांनी पाच कुख्यात आरोपीना अटक केली. नागपूरच्या यशोधरानगर (Police) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Live Marathi News)

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या होत्या. ग्रामीण भागात सक्रिय झालेल्या या टोळीकडून घरात कोणी नसल्याची संधी साधत घरफोडी करताना जे समान हातात लागेल ते चोरी करत होते. (Theft) चोरी केलेले साहित्य विकून यातून मिळणाऱ्या रकमेतील पैस आपापसात वाटून घेत होते. हे प्रकार वाढल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्यानुसार (Nagpur Police) पोलीस चोरी करणाऱ्या टोळीच्या मागावर होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दरम्यान यशोधरानगर पोलिसांनी टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले आहे. राहुल माणिकपुरी असं मुख्य आरोपीचं नाव आहे. त्यांच्याकरून दुचाकी, टीव्ही संच, सिलेंडर, दागिने,  कपडे आदी साहित्यासह ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच या टोळीने रामटेक, कामठी, जरीपटका तसेच लगतच्या वर्धा जिल्ह्यातील सेलु या भागातही चोरी केल्याचं तपासात समोर आले आहे. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT