Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News : ओव्हरटेक करण्यावरून वाद, भररस्त्यात कारचालकाचं महिलसोबत धक्कादायक कृत्य; VIDEO व्हायरल

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Crime News : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ कारला ओव्हरटेक केलं म्हणून, राग आलेल्या टॅक्सी चालकाने भररस्त्यात अडवून एका महिलेला जबर मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

मारहाण करणाऱ्या या व्यक्तीवर कठोरात-कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक सुद्धा केली असल्याची माहिती आहे.

शिवशंकर श्रीवास्तव असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. ही घटना दुपारी एक वाजता इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कार चालक इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. दरम्यान, मागून दुचाकीवरून येणाऱ्या महिलेने त्याला ओव्हरटेक केले.

महिलेच्या पुढे गेल्याने आरोपी कार चालकाने तिला शिवीगाळ केली. हे ऐकून महिला गाडीतून खाली उतरली आणि आरोपीशी वाद घालू लागली. दोघांमध्ये सुरू झालेला वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. आरोपीने कारमधून खाली उतरून महिलेवर हल्ला केला.

आरोपीने महिलेच्या तोंडावर अनेक वार केले. त्याचवेळी त्याने तिचे केस धरून ओढले. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने महिलेला मारहाण सुरूच ठेवली. काहींनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला. तो थोड्याच वेळात समाज माध्यमांवर वायरल झाला. या प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE: महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात थोड्याच वेळात मतदान

Baramati Crime: संतापजनक! फिरण्यासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीला लुटलं; निर्वस्त्र करत केली बेदम मारहाण

Lok Sabha 2024: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती

Horoscope Today : मेहनतीचे मिळणार फळ, प्रवासातून पालटणार भाग्य; तुमच्यासाठी कसा जाईल सोमवार?

Rashi Bhavishya: वृषभसह 4 राशींसाठी सोमवार ठरणार लकी, तुमची रास?

SCROLL FOR NEXT