Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: एकाच मुलीवर दोन युवकांचे प्रेम, तीही फिरायची दोन्‍ही प्रेमविरांसोबत; यातून झाले भयंकर प्रकरण

एकाच मुलीवर दोन युवकांचे प्रेम, तीही फिरायची दोन्‍ही प्रेमविरांसोबत; यातून झाले भयंकर प्रकरण

मंगेश मोहिते

नागपूर : एक फुल दो माली अशी प्रेम कहानी नागपुरात रंगली आणि एकाच्या कुटुंबावर रक्तरंजित हमला झाला. ही घटना (Nagpur News) नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून कुटुंबावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना (Police) पोलिसांनी अटक केली. (Maharashtra News)

पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील एका मुलीवर दोन युवकांचे प्रेम होते. ती मुलगी सुद्धा दोन्‍ही प्रेमविरांसोबत फिरायची. मात्र याचे परिणाम काही वेगळेच झाले. एका प्रेमविराने तिला दुसऱ्या सोबत फिरताना बघितले आणि तो त्याच्या घरी जाब विचारायला गेला. ज्याच्या घरी तो जाब विचारायला गेला; तो दुसरा प्रेमी होता. त्यावेळी त्याचे जावई आणि बहीण सुद्धा होती.

चर्चा केली अन्‌ झाली मारहाण

दोघांमध्ये आपसात चर्चा झाल्‍यानंतर दोघेही एकमेकांसोबत मारहाण (Crime News) करायला लागले. आरोपीने त्याच्या संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला. त्यामध्ये एका प्रेमीसोबत त्याचा जावई आणि बहीण सुद्धा या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर ज्या युवकांनी यांच्यावर हल्ला केला त्याला आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली. एकंदर म्हणजे प्रेम प्रकरणातून घडलेली ही घटना परिसराला हादरवणारी ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalagauri Vrat : मंगळागौरी व्रताची पूजा कधी, कशी आणि का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

अ‍ॅनॉलॉग पनीर म्हणजे काय? कसा ओळखायचा?

Maharashtra News Live Update: मला एकटं पाडण्याचा सरकारचा कट- मनोज जरांगे

MLA Death: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना झटका, ८० लाख लाभार्थी अपात्र; यादीत तुमचं नाव तर नाहीना? ५ मिनिटांत करा चेक

SCROLL FOR NEXT