Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: नागपूर हादरलं! ९ वर्षांच्या चिमुरडीवर बापाचा अत्याचार; नात्याला काळिमा फासणारी घटना

Nagpur Crime News: नागपूर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आईच्या गैरहजेरीचा फायदा घेत सावत्र पित्याने आपल्याच ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Crime News: नागपूर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आईच्या गैरहजेरीचा फायदा घेत सावत्र पित्याने आपल्याच ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. नागपुरच्या सदर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

क्रूर बापाने आपल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खळबळ उडवून दिली आहे. आईला हातमजुरीचे काम असल्याने तिने मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले. मात्र कामावरून आई घरी परतल्यावर मुलीने आईला आपला त्रास कथन केला. याप्रकरणी आरोपीचा पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) बलात्कार करणाऱ्या वडिलांना अटक केली.

धीरज (वय २५ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्य आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची २०२० मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरोपीशी ओळख झाली होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यामुळे महिलेने आरोपी धीरजसोबत प्रेमविवाह केला होता. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. (Breaking Marathi News)

आरोपी धीरज हा महिला आणि दोन्ही मुलांसह मुंबईत राहत होता आणि तिथे हातमजुरीचे काम करत होता. पाच महिन्यांपूर्वीच तो नागपुरात आला होता. आरोपी हा गेल्या पाच महिन्यांपासून बेरोजगार होता. आरोपी पतीची पत्नी ही ढाब्यावर काम करण्यासोबतच ती बंगल्यात साफसफाईचे कामही करत होती.

त्यामुळे ती रात्री उशिरा घरी यायची. शुक्रवारी (Nagpur News) महिला कामावरून घरी आल्यावर तिच्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. संशय आल्याने महिलेने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता वडिलांचे हे घृणास्पद कृत्य उघड झाले.

याआधी सुद्धा वडिलांनी तिच्यासोबत असं कृत्य केल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. या कृत्याची माहिती आईला सांगितली. तर तुझ्या आईला आणि लहान भावाला जीवे मारीन, अशी धमकी सुद्धा नराधम बापाने मुलीला दिली. हा सर्व प्रकार समोर येताच महिलेने मुलीला सोबत घेऊन सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी धीरजला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs SA-W: 'हा विजय भविष्यातील विजेत्यांना प्रेरणा देणारा', महिला संघाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

World Cup 2025: चक दे इंडिया! भारताच्या पोरींनी अखेर करून दाखवलंच; ICC वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच कोरलं नाव

Amanjot Kaur Direct Throw: वाह भाई वाह! अमनजोत कौरचं गजब क्षेत्ररक्षण; धाव चोरणाऱ्या खेळाडूच्या दांड्या केल्या गुल, Video Viral

Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कुटुंबीयांना हत्येचा संशय

ऑफिस आम्हाला परत द्या! काँग्रेस कार्यकर्त्यांचा BRSच्या कार्यालयावर हल्ला; खुर्च्या, फर्नीचरला लावली आग

SCROLL FOR NEXT