नागपूर : नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचं अचानक पोट दुखू लागल्याने तिला आईने डॉक्टरांकडे नेले. विद्यार्थीनीची तपासणी करताच डॉक्टरांसह मुलीच्या आईलाही धक्का बसला. ही मुलगी ४ महिन्यांची गर्भवती असल्याचं लक्षात आलं. या प्रकाराने मुलीच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. (Nagpur Todays News)
काय आहे प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, १६ वर्षीय पीडित विद्यार्थीनी शहरातील कळमेश्वर पोलीस ठाणे परिसरात राहते. रविवारी अचानक या विद्यार्थीनीचे पोट दुखू लागले. त्यामुळे आईने तिला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी विद्यार्थीनीची तपासणी केली असता, ती ४ महिन्यांची गर्भवती असल्याचं लक्षात आलं.
डॉक्टरांनी ही माहिती पीडित मुलीच्या आईला सांगताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीवर मुलीच्या आईचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मुलीची पुन्हा तपासणी करा अशी विनंती आईने डॉक्टरांना केली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. (Nagpur Crime News)
दरम्यान, हा प्रकार नेमका कसा घडला? याबाबत मुलीला वारंवार विचारून सुद्धा तिने उत्तर दिले नाही. विशेष बाब म्हणजे प्रियकराचे नाव सांगायला सुद्धा ही मुलगी नकार देत होती. आम्ही संमतीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले असल्याचं या मुलीने आईला सांगितलं.
मुलीच्या सांगण्यानुसार, तिने एप्रिल महिन्यात एका दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यासोबत शारिरीक संबध प्रस्थापित केले. घरी कुणी नसताना त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. यातून ती गरोदर राहिली. सुरूवातीला मुलीच्या लक्षात आलं नाही की ती गरोदर आहे, मात्र त्यानंतर गर्भवती असल्याची माहीत झाल्यानंतर ती घाबरली. घाबरलेल्या मुलीने याची कुणालाही कल्पना दिली नाही.
मात्र चार महिने झाल्यानंतर तिचे पोट दुखायला लागले. त्यानंतर आईने तिला रुग्णालयात नेलं असता, हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.