Nagpur Crime News 1 crore and 25 lac Rupees looted on the road lakadganj area sensational incident  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: वर्दळीच्या रस्त्यावरून 1 कोटी 25 लाखांची लूट, भर बाजारात घडला थरार; घटनेचा VIDEO समोर

Nagpur News Today: वर्दळीच्या ठिकाणी अनेकांचे येणे जाणे सुरू असताना दोन भामट्यांनी दुचाकीस्वाराला पकडलं. बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडून १ कोटी २५ लाखांची रोकड लुटून नेली.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Crime News: महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वर्दळीच्या ठिकाणी अनेकांचे येणे जाणे सुरू असताना दोन भामट्यांनी दुचाकीस्वाराला पकडलं. बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडून १ कोटी २५ लाखांची रोकड लुटून नेली.

ही थरारक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरडेखोरांनी तरुणाकडून लुटलेली रोकड हवालाची असल्याची जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, लुटण्यात आलेल्या रकमेचा आकडा पुढे आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. प्राप्त माहितीनुसार, नेहरू पुतळा परिसरात बारदाना गल्ली (Nagpur Crime) असून याच गल्लीत हवाला व्यापारी वीरम पटेल यांचे कार्यालय आहे.

नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पटेल यांनी कार्यालय बंद केले. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांच्या हाती सुमारे १ कोटी १५ लाखांची रोकड असलेली बॅग दिली. ही बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते दोन कर्मचारी भूतडा चेंबरपासून निघाले.

दरम्यान, रस्त्यावरून जात असताना दोन अज्ञात दरडेखोरांनी त्यांची दुचाकी थांबवली. कसलीही मारहाण अथवा काहीही न करता दोघांनी तरुणाच्या हाताला झटका मारून रोकड घेऊन पळ काढला. दरम्यान, लुटारूजवळून पळून आलेल्या तरुणांनी लुटमार झाल्याची माहिती पटेल यांना दिली.

पटेल यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. सव्वा कोटी लुटून नेल्याचे कळताच पोलीस हादरले. ठाणेदार अतुल सबनिस यांनी लगेच वरिष्ठांना माहिती कळवली. सव्वा कोटींची रक्कम घेऊन आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांना पकडण्यासाठी नाकेबंदीही करण्यात आली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT