Nagpur Dating App Scam News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : डेटिंग अ‍ॅपवर तरुणाशी ओळख, बारमध्ये भेटायला बोलावलं; तरुणीने नंतर जे काही केलं ते चक्रावून टाकणारं...

Nagpur Dating App Fraud : नागपुरात डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. तरुणाला बारमध्ये नेऊन त्याच्याकडून ३४ हजारांचे बिल जबरदस्तीने वसूल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नागपुरात डेटिंग अ‍ॅप फसवणूक उघड

  • तरुणाला बारमध्ये नेऊन ३४ हजारांचे बिल

  • धमकावून जबरदस्तीने पैसे वसूल

  • आरोपी तरुणी फरार

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Dating App Scam News डेटिंग अ‍ॅपचा वापर करून अनेकदा गैरप्रकार केला जातो. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या नावाखाली जाळं टाकत, बारमध्ये नेऊन हजारोंची बिल देण्यास भाग पाडत वसुली केली जात असल्याचं उघड झालं आहे. या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील एका तरुणाची हॅपन या डेटिंग अ‍ॅपवर अज्ञात तरुणीशी ओळख झाली. या तरुणीने पीडित तरुणाला भेटण्यासाठी बारमध्ये बोलावले. ठरल्या प्रमाणे दोघेही नागपूरमधील एका बारमध्ये भेटले. बारमध्ये पोहोचताच त्या तरुणीने महागड्या दारू आणि खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यास सुरुवात केली. काही ऑर्डर मागावत असतांना तरुणाला शंका आली आणि त्याने वेटरला बिल आणायला लावलं. काही वेळातच वेटरने ३४ हजार रुपयांचं बिल समोर ठेवलं.

हे बील पाहून पीडित तरुण देखील चक्रावला. त्याने तिथून निघण्याचा निर्णय घेतला. मात्र बारमधील कर्मचाऱ्यांनी तरुणाला बदनामी, मारहाण आणि जीव घेण्याची धमकी देत जबरदस्तीने त्याच्याकडून पैसे उकळले. धक्कादायक म्हणजे तरुणाला भेटायला आलेली संबंधित तरुणी घटनास्थळावरुन पसार झाली.

मात्र,हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना घाबरून सदर तरुणाने हॉटेलचं पूर्ण बिल भरलं. त्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने तडक पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तरुणी, बार मालक, मॅनेजर आणि बाऊन्सरविरोधात तक्रार दाखल केली. तरुणाच्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी तपास सुरु केला आहे. या अशा डेटिंग अ‍ॅपच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या फसवणुकीला बळी न पडत सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडच्या पारगाव शिरस गावात भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार

राज्याला मिळाले नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी

Madhavi Nimkar Photos: 'जणू आकाशातून अप्सराच अवतरली!' माधवीचं मराठमोळं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, जगातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?

राज्यात उष्णतेचा कहर! सरकारकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी; हे करा-हे टाळा’ SOP गाईडलाईन्स

SCROLL FOR NEXT