Nagpur Crime news Saamtv
महाराष्ट्र

देहविक्रीचं मोठं रॅकेट, तरुणींचे फोटो पाठवायचे, १००० रुपये घेऊन घरीच....; आई-मुलाचा खरा चेहरा उघड

Nagpur Crime News: नागपूर गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत सेक्स रॅकेटवर छापा टाकला. आई-मुलगा मिळून अवैध व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले.

Bhagyashree Kamble

  • नागपूर गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत सेक्स रॅकेटवर छापा टाकला.

  • आई-मुलगा मिळून अवैध व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले.

  • पोलिसांनी ९४,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका महिलेची सुटका केली.

  • आरोपी फक्त श्रीमंत व प्रीमियम ग्राहकांनाच लक्ष्य करत होते.

नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. गुन्हे शाखेने मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हा अवैध व्यवसाय आई-मुलगा मिळून चालवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत आई - मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना हुडकेश्वर लेआउटमधील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने बनावट ग्राहक तयार करून या रॅकेटशी ऑनलाइन संपर्क साधला. व्हॉट्सअॅपवर करार झाला. एका तरूणीला पाठवण्यासाठी आधी १ हजार मागण्यात आले. पैसे आरोपींपर्यंत पोहोचताच पोलिसांनी घरावर छापा टाकला.

सुनिता विकास कांबळे आणि यश विकास कांबळे असे आरोपीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी हे घर भाड्याने घेतले होते. आरटीओ विभागातील वैयक्तिक कामाचे कारण सांगून त्यांनी वास्तव्य केले, मात्र प्रत्यक्षात वेश्याव्यवसाय सुरू केला होता.

छाप्यामध्ये पोलिसांनी एका २७ वर्षीय छत्तीसगड येथील महिलेची सुटका केली. तिला पैशाचे आमिष दाखवून नागपूरमध्ये आणले होते. पोलिसांनी छाप्यातून ९४,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात ६३,५०० रुपये रोख आणि ३१,००० रुपयांचे चार मोबाईल फोन आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय हुशारीने आरोपी काम करीत होते. ते फक्त श्रीमंत आणि प्रीमियम ग्राहकांनाच टार्गेट करीत होते. मुलींचे फोटो आधी व्हॉट्सअॅपला पाठवायचे. नंतर रक्कम घेऊन मुलीला ग्राहकाकडे पाठवायचे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Pune Mhada: पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; आता नवीन तारीख काय?

Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या; आज कुठे कसं हवामान?

Expressway Accident : हायवेवर पहाटे काळाचा घाला, ७ बसे अन् ३ कार जळून खाक, ७ जणांचा जळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT