Maharashtra Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : सोशल मीडियावर मैत्री, १३ वर्षीय मुलीला हॉटेलवर नेऊन बलात्कार, नागपुरात खळबळ

Maharashtra Nagpur News : नागपुरात सोशल मीडियावरून ओळख झालेल्या तरुणाकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. आरोपी अटकेत; पालकांमध्ये संताप.

Alisha Khedekar

  • नागपुरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना

  • सोशल मीडियावरून ओळख करून प्रेमसंबंध

  • पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत

  • मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण

पराग ढोबळे, नागपूर

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. नागपुरात एका तरुणाने १३ वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक म्हणजे हा तरुण मुलीला शाळेला दांडी मारायला लावून तिला हॉटेलमध्येमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करायचा. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने पालकांमध्ये संताप उफाळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव करण केशी असे आहे, तर पीडितेचे नाव मानसी (बदलेलं नाव) असे आहे. करण आणि मानसीची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. करण आणि मानसीला तिच्या शाळेजवळ यायचा आणि तिला शाळेत जाऊ नको सांगून तिला हॉटेलवर न्यायचा. हॉटेलवर नेवून तिच्यावर बलात्कार करायचा.

गेले काही दिवस ही अत्याचाराची मालिका पिडीतेसोबत सुरूच होती. २७ मार्च रोजी देखील मानसी आणि करण शाळेजवळ भेटले. करणने तिला नेहमीप्रमाणे शाळेत जाऊ नको म्हणत शाळेच्या गेटवरून आरोपीने मुलीला गाडीवर बसवून फ्रेंड्स कॉलनीतील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे नेऊन मुलीने विरोध केल्यावरही तिच्यावर अत्याचार केला.

शाळेत मुलगी वारंवार गैरहजर असल्याबाबत शाळेतून पालकांना शिक्षकांनी संपर्क केला. त्यानंतर पालकांनी मुलीला याबाबत विचारल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. पालकांनी या प्रकरणात तातडीने पाऊल उचलत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पालकांनी याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. पालकांच्या तक्रारीवरून तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT