Nagpur Tuition Class Student Harassed Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : नागपूर हादरले! चौथीच्या विद्यार्थिनीचा ट्युशनमध्ये विनयभंग; वर्गात एकटी असल्याचा फायदा घेतला अन्...

Nagpur Crime News : नागपुरात चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिकवणी वर्गात गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • नागपुरात चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

  • शिकवणी वर्गात शिक्षिका उपस्थित नसताना विद्यार्थिनी एकटी असताना प्रकार घडला

  • पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला

  • पुढील तपास सुरु

नागपुरात चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षीय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनी शिकवणी वर्गात एकटी असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे चार ते साडेचारच्या दरम्यान संबंधित विद्यार्थिनी शिकवणी वर्गासाठी गेली होती. मात्र, त्यावेळी शिक्षिका वर्गात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थिनी वर्गात एकटीच अभ्यास करत होती. याचवेळी आरोपीने वर्गात येऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर विद्यार्थिनी घाबरली आणि शिकवणीचा वर्ग पूर्ण होण्यापूर्वीच ती घरी परतली. घरी आल्यानंतर तिने रडत आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीने दिलेल्या माहितीनंतर कुटुंबीयांनी तातडीने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी हा संबंधित शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेचे वडील असल्याचे समोर आले आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू केला. या प्रकरणी पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १२ तसेच बीएनएसच्या कलम ७५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांकडून तपासात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

घटनेची सविस्तर चौकशी सुरू असून, आरोपीविरोधातील आरोपांची पडताळणी करण्याचे काम एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींचे जबाब आणि उपलब्ध पुरावे तपासले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तीन दिवस ‘कुंभ भक्ती संगम’मधून भक्तिसंगीताचा जागर

Govinda Son : गोविंदाचा लेक गाजवणार बॉलिवूड; पहिल्या चित्रपटाचं मोठं अपडेट समोर, नाव अन् रिलीज डेट काय?

Rahul Gandhi Today Live : छात्रों की गुंज कार्यक्रमाला येणाऱ्या सगळ्या चाहत्यांसाठी मार्गदर्शक सूचना

ABVP Congress clash: राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी COEPमध्ये राडा; अभाविपच्या तक्रारीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पोहे की उपमा, वजन कमी करण्यासाठी काय खाणे ठरते जास्त फायदेशीर?

SCROLL FOR NEXT