Nagpur Congress On Mohan Bhagwat Statement  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News : सरसंघचालकांच्या विधानाने नवा वाद; युवक काँग्रेस आक्रमक, थेट केली अटकेची मागणी

Nagpur Congress On Mohan Bhagwat Statement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर बनल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले असे म्हटले होते. या विधानाला विरोध म्हणून काँग्रेसने आंदोलन केले.

Yash Shirke

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nagpur News : नागपुरमध्ये युवक काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. काँग्रेस भवन ते संघ मुख्यालय या मार्गावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. मोहन भागवत यांना अटक करा, आरएसएस बॅन असे बॅनर आंदोलकांच्या हातामध्ये होते.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदौर येथे एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य हे राम मंदिर बनल्यानंतर मिळाले असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नागपुरातील युवक काँग्रेसने आंदोलन केले. वादग्रस्त विधानामुळे सरसंघचालकांना अटक करा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात आरएसएसची खाकी पँट जाळण्यात आली.

नागपुरातील देवडिया भवन येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांची बैठक झाली. या बैठकीत मोहन भागवत यांच्या विधानाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.

युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाकडे जात असताना काँग्रेस कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली. संघाच्या मुख्यालयाजवळ जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यामध्येच रोखून ठेवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT