Nagpur Congress Leader Arrested  Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Why Congress leader Harish Gwalbanshi arrested in Nagpur : नागपूरमध्ये कळमेश्वर निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना आरिफ शेख यांच्यावर अपहरण व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला आहे.

Namdeo Kumbhar

  • निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते हरीश ग्वालबंशी यांच्याकडून आरिफ शेख यांना मारहाण व अपहरण केल्याचा आरोप.

  • “भाजपचे समर्थन का करतोस?” म्हणून आरिफला कारमध्ये कोंबून बेदम मारहाण केल्याची माहिती.

  • पोलिसांनी हरीश ग्वालबंशी, आशू ग्वालबंशी यांच्यासह इतर आरोपींना अटक करून चौकशी सुरू केली.

  • आरिफची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Congress Leader Arrested : निवडणूक प्रचारात राडा आणि हाणामारी केल्याच्या आरोपाखाली नागपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.  कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारावेळी झालेल्या वादावरुन मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या नेत्याचे नाव हरिश ग्वालबंशी यांना अटक करण्यात आली आहे. ते नागपूर काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. हरिश ग्वालबंशी यांना अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहेत. या प्रकररणामुळे कळमेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले आहे.

आरिफ नावाच्या एका व्यक्तीला काँग्रेसचे नागपुरातील माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या पाच ते सहा सहकार्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी कारवाई करत बेड्या ठोकल्या. पोलीसांनी हरीश ग्वालबंशी, आशू ग्वालबंशी यांच्यासह इतर काही आरोपींना अटक केली. पोलिसांकडून आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

आरीफ लतीफ शेख यांना अपहरण आणि मारहाण प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. तू काँग्रेसाठी काम का करत नाही, भाजपला का पाठिंबा देतो? म्हणत आरीफ याला काँग्रेस नेत्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत आरीफ जखमी झाला होता. त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. आरीफ यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. आरीफ याला मारहाण झाल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

नेमकं झालं काय होतं?

रविवारी रात्री आरिफ याला आशिष ग्वालबंशीने भेटायला बोलवले. पण त्याने नकार दिला. त्याच रात्री अकरा आरिफ विसावा बारसमोर उभा राहून फोनवर बोलत होता. त्यावेळी आरोपी आले अन् शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला चारचाकी गाडीत टाकले अन् नागपूरच्या दिशेने निघाले. आरीफ याला गाडीतही बेदम मारले अन् सोडून दिले. आरिफ याला मित्रांनी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरीफ याने पोलिसांत तक्रार दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT