भाजपचे काही मतं फुटणार का हे काँग्रेसच्या नेत्यांना विचारा - छोटू भोयर Saam Tv
महाराष्ट्र

भाजपचे काही मतं फुटणार का हे काँग्रेसच्या नेत्यांना विचारा - छोटू भोयर

मतदारांनी सदसदविवेक बुद्धीने मतदान करावं - छोटू भोयर

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. 15 केंद्रांवर मतदान पार पडते आहे. प्रत्येक्ष मतदानाला काही तास शिल्लक असताना काँग्रेसने अधिकृत उमेदवार बदलवून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं आता भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरूद्ध काँग्रेस समर्थीत अपक्ष उमेदवार यांच्यात लढत होत आहे. मात्र, भाजपकडे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळं भाजपचं पारडं या निवडणुकीत जड आहे. त्यावर आता छोटू भोयर यांनी आपली प्रतिक्रया दिली आहे.

ते म्हणले की, मी निवडणूक लढवायला असमर्थता दर्शवली नव्हती, मात्र काँग्रेसने उमेदवार बदलायचा निर्णय घेतला, त्या निर्णयासोबत मी आहे. मतदारांनी सदसदविवेक बुद्धीने मतदान करावं असं आवाहन छोटू भोयर यांनी केलं आहे. आज छोटू भोयर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या १२ तास आधी छोटू भोयर यांना बदलून काँग्रेसने मंगेश देशमुख यांना समर्थन दिलं. आता भाजपचे काही मतं फुटणार का हे काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, असंही छोटू भोयर म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT