Nagpur-Chhatrapati Sambhajinagar Highway Accident  Saam TV
महाराष्ट्र

Accident News : नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात; २० हून अधिक प्रवासी जखमी

Nagpur-Chhatrapati Sambhajinagar Highway Accident : नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनर आणि दोन ट्रॅव्हल्स एकमेकांना धडकल्या.

Satish Daud

नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. भरधाव कंटेनर आणि दोन ट्रॅव्हल्स एकमेकांना धडकल्या. अपघात इतका भीषण होता, की तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेत जवळपास २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जखमीपैंकी ४ ते ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे कंटेनर येत होता. त्याचवेळी पुणे येथून प्रवाशांना घेऊन दोन खासगी ट्रॅव्हल्स अमरावतीच्या नागपूरच्या दिशेने येत होत्या. कारंजा तालुक्यातील पेडगाव येथे पहाटेच्या सुमारास तिन्ही वाहने एकमेकांना धडकली.

अपघात इतका भीषण होता, की तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत ट्रॅव्हल्समधील २० प्रवासी जखमी झाले. यातील ४-५ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नागपुरात पुन्हा हिट अँड रनची घटना

नागपूर शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. सुसाट वेगात असलेल्या ट्रकने एका अल्पवयीन मुलाला चिरडलं आहे. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अश्विन आठवले (वय १७) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. काटोल रोडवरील गोरेवाडा झू परिसरात गुरुवारी (ता. २०) रात्री उशीरा ही घटना घडली आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT