Nagpur Jail  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime : गर्लफ्रेंडवरून नागपूर जेलमध्ये टोळीयुद्ध, कैद्यांच्या दोन गटात मोठा राडा

nagpur two group fight : नागपूर जेलमध्ये गर्लफ्रेंडवरून कैंद्याच्या दोन गटात तुफान राडा झाला. कैद्यांच्या दोन गटात झालेल्या भांडणात काही कैदी जखमी झाले. या भांडणामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : नागपूर कारागृहात कैद्यांचं पुन्हा एकदा टोळीयुद्ध झाल्याची घटना घडली आहे. कारागृहातल दोन गटात मोठा राडा झाला. कारागृहात एका गुंडाच्या प्रेयसीबद्दल अपशब्द वापरल्याने दोन गटात तुफान राडा झाला. दोन गटाच्या हाणामारीत चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी धंतोली पोलिसांत ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नागपूर जेलमध्ये टोळीयुद्ध

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर कारागृहात कैद्यांच्या दोन गटात गर्लफ्रेंडवरून जोरदार राडा झाला. जेलमधील दोन गटाची फ्रीस्टाईल हाणामारी झाली. दोन गटात तुफान झालेल्या भांडणात जेलमधील साहित्यांचे नुकसान झालं.

दोन्ही गटातील कैद्यांनी टीव्ही संच आणि इतर साहित्य फोडले. या हाणामारीत काही कैदी किरकोळ जखमी झाले. त्यानंतर कारागृहातच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दिवसाढवळ्या झालेल्या टोळीयुद्धामुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूर कारागृहातील दोन कैद्यांनी एकाच्या गर्लफ्रेंडविषयी आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या गेल्या. यामुळे एका कैद्याला राग आला. यामुळे या कैद्याने रागाच्या भरात त्या कैद्यांवर हल्ला चढवला. या हल्यात एक कैदी जखमी झाला. यावेळी दोन्ही गटातील कैद्यांनी एकमेकांवर हल्ले केले. या हाणामारीत काही कैदी जखमी झाले. यानंतर कारागृहात एकच खळबळ उडाली. विविध गुन्ह्यात अटकेत असलेलं हे सर्व कैदी आहेत. राडा केल्यानं 7 जणांवर धंतोली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांचं नदीत रूपांतर

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगा प्रशिक्षकाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT