Jalna Accident: समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; ट्रकचा अपघात पाहणाऱ्या अख्खा कुटुंबाला ॲम्बुलन्सनं चिरडलं

Jalna Samruddhi Mahamarg Accident: जालना येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघात झालाय. ट्रकचा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाला रुग्णवाहिकेने चिरडलं आहे.
Jalna Samruddhi Expressway Accident:
Damaged vehicles seen at the accident spot on Samruddhi Expressway near Jamwadi in Jalna district.Saam tv
Published On
Summary
  • समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात

  • ट्रक अपघात पाहताना कुटुंब रस्त्यावर उतरले

  • ॲम्बुलन्सने चिरडल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडलाय. जालन्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या जामवाडी येथे ही भीषण दुर्घटना झाली. मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर ट्रकला झालेल्या अपघात पाहण्यासाठी एका वाहनामधील काही लोक रस्त्यावर उतरलं होतं. त्यावेळी मागून येणाऱ्या एका अँम्बुलन्सनं त्यांना चिरडलं.

समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीकच्या समृद्धी महामार्गावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला अपघात झाला होता. कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. सुदैवाने अपघातावेळी प्रतापराव जाधव कारमध्ये नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

Jalna Samruddhi Expressway Accident:
Kalyan-Latur Mahamarg: कल्याण-बीड-लातूर.... जनकल्याण महामार्ग 6 जिल्ह्यातून जाणार, वाचा कोणकोणत्या तालुक्याला होणार फायदा

हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर सोडल्यानंतर त्यांचे अंगरक्षक, सहकारी आणि कारचालक हे मेहकरच्या दिशेने जात होते. त्यावेळी समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारला भयंकर अपघात झाला. कारने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com