हो नाही हो नाही, म्हणता, म्हणता... अखेर दोन्ही राष्ट्रवादीची युती झालीय...भाजपला रोखण्यासाठी राज्यातील तीन महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत...पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत तर खुद्द अजित पवांरांनीच युतीची घोषणा केलीय.. दुसरीकडे कार्यकर्त्यांसाठी दोन्ही पक्ष एकत्र आल्याचं रोहित पवारांनी सांगितलयं...
पिंपरी चिंचवड महापालिकेसह पुणे आणि परभणी महापालिकेतही काका- पुतण्या एकत्र येणार आहे.... आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय... दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे पक्षांची ताकदही चांगलीच वाढणार असल्याचा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जातोय...अशातच दोन्ही पक्षात जागावाटपावर जवळपास एकमत झालायं..
दुसरीकडे परभणी महापालिकेतील जागावाटप लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी दिलीय...पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता..राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर.. पुण्यात 2017 साली भाजपला 36.67 टक्के मतं मिळाली तर राष्ट्रवादीला 21.94 टक्के मतं.. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपपुढे आव्हानं... पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची मोठी ताकद आहे...त्यामुळे भाजपविरोधी मताचं विभाजन टळून दोन्ही राष्ट्रवादीला फायदा... परभणी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस 2017 च्या निवडणुकीनुसार दुसऱ्या क्रमांकावर तर भाजप तिसऱ्या त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे भाजपला दोन आकडी संख्या गाठणं कठीण...
नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीतही महायुतीतील मित्रपक्ष अनेक महापालिकांमध्ये वेगवेगळे लढतायत... अशातच पुणे, पिंपरी चिंचवड, परभणीमधील दोन्ही राष्ट्रवादीची युती ही भाजपला रोखण्यासाठी आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरेल... आता दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीला मतदार बळ देणार का? भाजपला दूर सारून सत्तासोपानापर्यंत पोहचणं दोन्ही राष्ट्रवादीला सहजसाध्य होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.