Nagpur Crime संजय डाफ
महाराष्ट्र

स्कूल बसवरील महिला कंडक्टरची निर्घृण हत्या; मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून फेकला

नागपुरमध्ये हत्याचे सत्र काही कमी होताना दिसून येत नाही.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपुरमध्ये हत्याचे सत्र काही कमी होताना दिसून येत नाही. एका शालेय बसवर असलेल्या महिला कंडक्टरची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. कपिल नगर पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत उप्पलवाडी रोडवर काल सायंकाळी एका प्लास्टिक बॅगमध्ये महिलेचा मृतदेह गुंडाळून फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह ४१ वर्षीय दीपा दास या महिलेचा असून त्या नागपुरातील एका नामांकित शाळेच्या (school) स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. (Nagpur Brutal killing female conductor on school bus)

हे देखील पहा-

दीपा दास यांनी शनिवारी त्यांच्या नियमितपणे बसमधील सर्व मुलांना घरी सोडले. यानंतर कुशीनगर भागामध्ये त्या देखील बसमधून उतरले. तिथून त्या आपल्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. मैत्रिणीकडे १० मिनिटे थांबल्यानंतर घरी परत जात असताना त्या बेपत्ता झाले होते. कुटुंबीय आणि पोलीस शनिवार संध्याकाळपासून त्यांचा शोध घेत होते. मात्र, रविवारी संध्याकाळी उप्पलवाडी रोडवर प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळलेला अवस्थेत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठल्यावर केलेल्या तपासात तो मृतदेह शालेय बसवर कंडक्टर असलेल्या दीपा दास यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. दीपा दास यांची हत्या कोणी आणि का केली हे अजूनही स्पष्ट झाले नाही. दरम्यान दीपा दास यांची हत्या इतर ठिकाणी केल्यानंतर मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरुन गोपळवाडी रोडवर फेकला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT