Naigaon Crime
Naigaon CrimeSaam Tv

नायगावात अल्पवयीन मुलीवर मौलानाकडून बलात्काराचा प्रयत्न; नागरिकांकडून चोप

सुट्टे पैसे देण्याचे आमिष देऊन बलात्काराचा प्रयत्न
Published on

वसई/विरार: नायगावात एका मस्जिदच्या मौलालाने ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा (sexual assualt) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नूरल हसन असे या मौलानाचे नाव असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जमलेल्या संतप्त नागरिकांनी मौलानाला विवस्त्र करून बेदम चोप दिला आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास नायगाव पूर्वेच्या गणेश नगर परिसरात ही घटना घडली आहे.

हे देखील पहा-

७ वर्षीय मुलगी दुकानात सुट्टे पैसे मागण्यासाठी गेली असताना या मौलानाने तिला आमिष (Bait) देऊन तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला आहे. यावेळी मुलीने आरडा- ओरड करून पळ काढल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले व जमलेल्या नागरिकांनी या मौलानाला बेदम चोप देत पोलिसांच्या (police) स्वाधीन केले आहे. याप्रकरणी अधिक तपास वसई वालीव पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com