Nagpur Train News:  Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: ४० विद्यार्थ्यांसह बस रुळावर अडकली अन् भरधाव ट्रेन आली, काळजाचा ठोका चुकवणारा क्षण; मोठा अनर्थ टळला!

Nagpur Train News: समोरुन येणारी भरधाव ट्रेन आणि मध्येच बस अडकल्याने नेमकं करायचं काय? असाच प्रश्न सर्वांना पडला. मात्र नागरिकांसह रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे ट्रेन थांबली आणि मोठी दुर्घटना टळली.

Gangappa Pujari

नागपुरमध्ये आज एक मोठी दुर्घटना टळली. नागपुरातील खापरखेडा रेल्वे रूळ क्रॉसिंग करताना गेट बंद झाल आणि 40 विद्यार्थी घेऊन जाणारी बसमध्येच अडकली. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग मात्र सुदैवाने मोटरमॅनच्या सतर्कतेमुळे ट्रेन थांबली अन् सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काय घडलं नेमकं? वाचा सविस्तर

नागपुरातील खापरखेडा रेल्वे रूळवर क्रॉसिंग करताना अचानक गेट बंद झाल्याने ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रुळावरच अडकली. समोरुन येणारी भरधाव ट्रेन आणि मध्येच बस अडकल्याने नेमकं करायचं काय? असाच प्रश्न सर्वांना पडला. मात्र नागरिकांसह रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे ट्रेन थांबली आणि मोठी दुर्घटना टळली.

समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर छिंदवाडा रेल्वे मार्गावर ही घटना चार वाजताच्या सुमारास घडली. खापरखेडा रेल्वे रूळावर एका बस चालकाने गेट बंद होत असतानाच रुळ क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे गेट अचानक बंद झाल्याने बसमध्येच अडकली. ४० विद्यार्थ्यांसह बसमध्येच अडकल्याने सर्वजण घाबरुन गेले.

यावेळी काही नागरिकांनी सतर्कता दाखवत समोरुन येणाऱ्या ट्रेनला अलर्ट देण्यासाठी रेल्वे रुळावार लाल रंगाचे कठडे ठेवले. रेल्वे चालकानेही धोक्याचा इशारा ओळखत ट्रेन थांबवली अन् सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर एक गेट उघडून बस बाहेर काढण्यात आली. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग होता, मात्र नागरिकांच्या आणि रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT