Nagpur Breaking : नागपूर मेट्रोत तब्बल २००० कोटींचा भ्रष्टाचार? SaamTvNews
महाराष्ट्र

Nagpur Breaking : नागपूर मेट्रोत तब्बल २००० कोटींचा भ्रष्टाचार?

कंत्राट न काढता कामं दिल्याचा आरोप !

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर : महामेट्रोच्या नागपूर (Nagpur Metro) प्रकल्पात २००० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केलाय. कंत्राट न काढता कामं देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. तसंच नागपूरातील स्थानिक व्यापाऱ्यांचे जवळपास ३८ कोटी रुपये थकवले असून सोमवारपासून हे व्यापारी नागपूर (Nagpur) मेट्रोविरोघात उपोषणाला बसणार, असंही प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे देखील पहा :

प्रशांत पवार यांनी मेट्रोचे एमडी ब्रीजेश दिक्षीत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. २०१९ पासून महामेट्रोने पैसे थकवल्याचा आरोप करण्यात आलाय. ज्या स्थानिक व्यापाऱ्यांचे पैसे थकवल्याचा आरोप केलाय, ते व्यापारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. नागपूरातील स्थानिक व्यापाऱ्यांचे ३८ कोटी रुपये थकवले, याची राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार, असं नागपूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT