Bhagat Singh Koshyari Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्यपाल कोश्यारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा; नागपुरातील भाजप नेत्याची मागणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bhagat Singh Koshyari Latest News : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले. अनेक नेत्यांनी तसेच शिवप्रेमींनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर टीका देखील केली. दरम्यान, आता भाजपमधूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी राज्यपालांच्या (Bhagat-Singh-Koshyari) हकालपट्टीची मागणी केली आहे. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा', असं रेड्डी यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर निघायला पाहिजे. २०१४ ला छत्रपती शिवरायांची साथ घेवूनच मोदीजी पंतप्रधान झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नाही', असं म्हणत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका देखील केली आहे.

राज्यपालांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो : अमृता फडणवीस

दुसरीकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपालांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. राज्यपालांचं मराठी भाषेवर प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत, जे मराठी शिकत आहेत. असं अमृता फडणवीसांनी (Amrita Fadnavis) म्हटलं आहे. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो, ते मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे राज्यपाल आहे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

कोश्यारींचं राज्यपालपद जाणार?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीकडून वारंवार वारंवार केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील भाजप नेत्यांना देखील टीकेला समोरं जावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्यपाल बदलण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

जर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या विधानांबाबत वरिष्ठांसोबत चर्चा केली. तर राज्याला नवे राज्यपाल मिळणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

SCROLL FOR NEXT