Nagpur Bench Rules Saam Tv
महाराष्ट्र

'अनैतिक संबध असले तरी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा लागू होत नाही', हायकोर्टाचा निर्णय

Nagpur Bench Rules: गोंदियातील एका प्रकरणात आरोपीवर मृत महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप होता. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Bhagyashree Kamble

  • गोंदियातील एका प्रकरणात हायकोर्टाचा निकाल.

  • अनैतिक संबंध असल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा लागू होऊ शकत नाही.

  • आरोपीविरूद्ध दाखल एफआयआर रद्द.

गोंदिया जिल्ह्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्वाचा निकाल दिला आहे. 'केवळ आत्महत्या केलेल्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते, म्हणून संबंधित पुरूषाविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही', असे स्पष्ट करत हायकोर्टानं या प्रकरणातील आरोपीविरूद्ध दाखल एफआयआर रद्द केला आहे.

ही भयंकर घटना ९ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती. सालकेसा पोलीस ठाण्यात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या प्रवीण बोरकर याचे सहकारी महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर प्रवीण बोरकरांवर संशयाची सुई फिरली. बोरकरविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, या प्रकरणात बोरकर यानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, सुनावणी पार पडली. सुनावणीत हायकोर्टानं स्पष्ट केलं की, 'बोरकर आणि मृत महिलेचे अनैतिक संबंध होते. याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तसेच अनैतिक संबंध असले तरी, बोरकर यानं मृत महिलेपुढे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय ठेवला नाही, असा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही'.

असं हायकोर्टानं या प्रकरणात स्पष्ट केलं. यामुळे या गुन्ह्यातील आरोपी प्रवीण बोरकरविरूद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात आला आहे. कोर्टानं दिलेल्या निकालानंतर बोरकर यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mega Sale 2025: डबल धमाका! एकीकडे GST कपात आणि दुसरीकडे अमेझॉन-फ्लिपकार्ट विक्री, सवलतींचा दुप्पट फायदा

Maharashtra Politics: विदर्भात महाविकास आघाडीला मोठं खिंडार, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

Sanjay Raut: क्रिकेट मॅच ते जय शहांना भारत रत्न" संजय राऊत संतापले|VIDEO

Heart Attack Symptoms: शरीर धडधाकट तरीही Heart Attackचा धोका? तज्ज्ञ सांगतात 'ही' लक्षणे असतील तर..

Maharashtra Live News Update: पैठण तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार

SCROLL FOR NEXT