Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

Maharashtra Political News : नागपूर खंडपीठानं दिलेल्या एका निर्णयामुळे नगरपरिषदांची मतमोजणी लांबणीवर गेलीय.. मात्र दुसरीकडे विरोधकांनी थेट आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत... मात्र नागपूर खडंपीठानं मतमोजणीबाबत नेमकं काय म्हटलं? मतमोजणी पुढे ढकण्यामागे कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

निवडणूक आयोगापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राजकीय पक्ष आणि नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारांना झटका दिलाय.. 222 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरऐवजी थेट 21 डिसेंबरला करण्याचे आदेशच नागपूर खंडपीठानं दिले आहेत..न्यायालयानं नेमके काय आदेश दिले आहेत? पाहूयात...

पहिल्या टप्प्यातील निकालाचा दुसऱ्या टप्प्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सर्व जागांसाठीची मतमोजणी 21 डिसेंबरला

20 डिसेंबरपर्यंत एग्झिट पोलवरही बंदी

21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिताही लागू राहणार

नागपूर खंडपीठाने मतमोजणी लांबणीवर टाकण्याचे आदेश दिल्यानंतर आता विरोधकांनी संताप व्यक्त केलाय. दुसरीकडे सत्ताधारी शिंदेसेनेनेही निवडणूक लांबणीवर टाकण्यामागे सेटिंग बाकी असेल, अशी शंका उपस्थित करत विरोधकांच्या सुरात सुर मिसळलाय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आयोगाच्या कारभारावर टीका केलीय.

खरंतर याआधीही विरोधकांनी मतदानानंतर ईव्हीएमसोबत छेडछाड केली जात असल्याचे आरोप केले होते..आता तर तब्बल 19 दिवस ईव्हीएम स्ट्राँगरुममध्ये ठेवाव्या लागणार आहेत.. त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या सुरक्षा- प्रशासकीय यंत्रणेचा खर्च, तांत्रिक खर्च, जागेचं भाडं यासाठी दररोज कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहेत.. एवढंच नाही तर एकूणच यावेळी ८ ते १० वर्षांच्या कालावधीनंतर होणाऱ्या या निवडणुकीतील सावळ्या गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांचा निवडणूक यंत्रणेवरचा विश्वास उडण्याचीच शक्यता जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : मोठी बातमी! रॅपिडो बाइक - टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश; वाचा सविस्तर

DoT Telecom Rules: मोबाईलवर येणाऱ्या इनकमिंग कॉलबाबत नवा नियम; १ नोव्हेंबरपासून काय बदलणार, जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: MPSC प्रकरणाच्या चौकशी आयोगात माझा सहभाग असल्याबाबत कोणतीही माहिती माझ्याकडे नाही - तुकाराम मुंढे

घर नवऱ्याच्या नावावर, तरीही त्यालाच घराबाहेर काढलं! बायकोने जिंकली केस; कोर्टाचा निर्णय नेमका काय?

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेता मयूर ठाकरेला अटक

SCROLL FOR NEXT