Class 10Th Student
Class 10Th Student Saam Tv
महाराष्ट्र

Class 10Th Student: नागपूर हादरलं! दहावीत 71 टक्के गुण मिळूनही विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल...

संजय डाफ

Nagarpur News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या परीक्षेच्या निकाल (10th ssc result 2023) शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत हवं असलेलं यश मिळवता आलं नसल्याने नागपूरमधील दोन विद्यार्थिनींने टोकाचं पाऊल उचलं आहे.

निकाल लागून 24 तास ही झाले नसताना येथे दोन विद्यार्थिनींनी नैराश्यातून आयुष्य संपवलं आहे. यात वाडी परिसरातील रामदुलारी पंचम झारीया या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने गळफास लावून केली आपलं जीवन संपवलं.

तर सक्करदरा परिसरात चेतना भोजराज भोयर हिला 71 टक्के गुण मिळूनही अपेक्षित गुण न मिळाल्याच्या कारणावरून तिने आपलं जीवन संपवलं. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनाला दहावीच्या निकालात ७१ टक्के गुण मिळाले या कारणावरून ती नाराज होती. यातच तिने घरी कोणी नसताना बेडरूममध्ये सिलींग फॅनला ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवलं.

या दोन्ही विद्यार्थिनींने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण नागपूर हादरलं आहे. यातच आजही विद्यार्थ्यांवर निकालाचा किती दबाव असतो हे समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

Nawazuddin Siddiqui Net Worth : एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा नवाज आज आहे कोट्यवधींचा मालक

Chhagan Bhujabal News | मविआचा 35 जागांचा दावा भुजबळांनी असा खोडून काढला..

Delhi Metro: पुन्हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल; लेडीज कोचमध्ये मुलीचा अश्लील डान्स Watch video

Shakuntala Railways | अबब! चोरट्यांनी थेट रेल्वे ट्रॅकच पळवला!

SCROLL FOR NEXT