Bjp Emerges As Number One Party In Maharashtra Municipal Elections Saam tv
महाराष्ट्र

Local Body Election: पालिका निवडणुकीत भाजप नंबर १ चा पक्ष कसा ठरला, कुणाला क्रेडिट आणि कसा होता प्लान?

Local Body Election: महाराष्ट्रातील नगरालिका आणि परिषदांच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळवले. देवेंद्र फडणवीस यांचे रणनीती, नेतृत्व आणि रवींद्र चव्हाण यांचे नियोजनाने कमाल दाखवलीय. याचमुळे भाजप नंबर १ चा पक्ष कसा बनलाय.

Bharat Jadhav

  • नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला

  • देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अजेंडा प्रभावी ठरला

  • रविंद्र चव्हाण यांच्या संघटन कौशल्याचा थेट फायदा भाजपला झाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विकासाभिमुख राजकारण आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे संघटन कौशल्य आणि अचूक निवडणूक नियोजन यांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात प्रथमच नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक निकालात अभूतपूर्व यश मिळवलं. महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांच्या मुखातून देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीचा नेहमी होणारा आदरार्थी उल्लेख आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी आज सार्थ ठरवला.

यंदाच्या निवडणुकीत प्रचारगीतातून गाजलेले "तुमची आमची भाजप सर्वांची" हे बोल महाराष्ट्रातील जनतेने खरे करून दाखवले, हे या निकालावरून सिद्ध झाल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र पिंजून काढला

रवींद्र चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर अतिशय शिस्तबद्धपणे आणि संयम व आक्रमकपणाच्या अनोख्या शैलीतून महाराष्ट्र पिंजून काढला. यादरम्यान अनेक दिग्गज नेते त्यांनी भाजपात आणले. कोकणात वर्चस्व असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचा खरंतर या निवडणुकांच्या निमित्ताने कस लागला, त्यात रविंद्र चव्हाण पैकीच्या पैकी गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले.

राज्यात अनेक ठिकाणी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशी भाजपाची लढत होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या चातुर्यामुळे आणि रविंद्र चव्हाण यांच्या संघटन कौशल्यामुळे अनेक ठिकाणी लढत जिंकल्या. मात्र त्याचवेळी राज्यात सत्तास्थानाला किंवा महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचं गणित देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांनी एकत्रितपणे अचूक सोडवले. याबरोबरच सेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीला भाजपने त्यांची जागाही दाखवली असे दिसते.

श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेले रविंद्र चव्हाण यांचे प्रेम व तिरस्कार असे दुहेरी संबंध गेल्या काही दिवसांतील भाजप पक्ष प्रवेशामुळे अधिक गहिरे होतील का? अशी शक्यता आजच्या निकालांमुळे झाली आहे. जानेवारीत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या बाबतीतही देवेंद्र-रविंद्र यांची किमया चालेल अशीच शक्यता अधिक असल्याने मात्र महायुतीतील सहकारी पक्ष आता कशी व्यूहरचना करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

Maharashtra Live News Update: निलंगा नगरपालिकेत पराभव झालेल्या उमेदवारांने काढली, आभार रॅली, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Crime News: माजी पोलीस महानिरीक्षकानं स्वत:वर झाडली गोळी, १२ पानाच्या सुसाईड नोटमधून समोर आलं धक्कादायक कारण

20 हजारांची कॅश ठेवाल तर शिक्षा? कॅश सापडल्यास 100% दंड भरावा लागेल?

SCROLL FOR NEXT