Blue Water Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Blue Water: जमिनीतून येतंय निळं पाणी! काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Dharashiv News: ज्या ठिकाणी वीज पडते त्या ठिकाणी जमिनीतून निळं पाणी येतं हे तुम्हाला माहिती आहे का? असं आम्ही म्हणत नाहीये, तर असा व्हिडीओ व्हायरल करून दावा केला जातोय.

Mayuresh Kadav

जमिनीतून निळं पाणी येतंय पाहून आश्चर्य वाटले असेल. वीज पडल्याने जमिनीतून निळं पाणी येत असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हे पाणी शेतीसाठी घातक असल्याचा मेसेज व्हायरल होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नीट निरखून पाहिलं तर पाण्याचा रंग निळा दिसतोय. त्यामुळे हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल झाल्याने आमच्या टीमने याची पडताळणी सुरू केली. हा व्हिडिओ धाराशिवच्या तुळजापूरच्या मसला खुर्द गावातील असल्याचं कळालं. आमची टीमने गावातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी गावात वीज पडली नसल्याची माहिती मिळाली. मग नक्की हे निळं पाणी आलं कुठून? याची माहिती भूजल वैज्ञानिक देऊ शकतात, आमची टीम एक्स्पर्टलाही भेटली. यानंतर सत्य समोर आलं आहे.

याची पडताळणी केली असता अशी माहिती समोर आली की, वीज पाडल्यामुळे जमिनीतून निळं पाणी आलेलं नाही. द्राक्षबागांसाठी लागणारे रसायन खराब झाल्याने फेकून दिलं होतं. नदीमध्ये रासायनिक द्रव टाकल्याने पावसाच्या पाण्यात मिक्स झालं. रासायनिक द्रवाचा रंग नदीच्या प्रवाहातून बाहेर आल्याने निळा रंग दिसला

त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. पाऊस असल्याने शेतकरी शेतीच्या कामात गुंतलाय. त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल करून शेतकर्‍यांची दिशाभूल केली जातेय. आमच्या पडताळणीत हे निळं पाणी रसायनाचा रंग असल्याचं समोर आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teachers Summer Vacation: महत्त्वाची बातमी! शिक्षकांना यंदा उन्हाळ्याची सुट्टी नाहीच; कारण आलं समोर

Maharashtra Live News Update : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत

देशावर मोठं संकट! होर्मुझ सामुद्रधुनीत 22 भारतीय जहाजं अडकली|VIDEO

Pimples And Dark Spots : तेलकट त्वचेवर लावा कोरफड आणि लिंबाचा रस, पिपंल्स आणि काळे डाग होतील कमी

Sara Ali Khan : मी सनातनी...; केदारनाथ-बद्रीनाथला जाण्यासाठी सारा अली खानला पूर्ण करावी लागणार 'ही' अट, कोणी घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT