Mahavikas Aghadi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politcs : सहानभूती संपली, मविआ हरली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maha Vikas Aghadi Defeat in Assembly Election 2024: लोकसभेत मोठं यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीचा विधानसभेला दारुण पराभव झाला आहे. ठाकरे, पवारांबाबत असलेली सहानभुतीची लाट ओसरली आहे. आत्मविश्वास वाढलेल्या मविआला काय भोवंलं. पाहूया एक खास रिपोर्ट.

Girish Nikam

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मविआची कामगिरी सरस झाली होती. ४८ पैकी ३० जागांवर विजय झाला होता. त्यामुळे साहजिकच आत्मविश्वास वाढलेले मविआचे नेते विधानसभेला मोठ्या उर्जेने कामाला लागले होते. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नही पडू लागली होती. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर मविआच्या अनेक नेत्यांची स्वप्न उध्वस्त झाली आहे. मविआचा अनपेक्षित असा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसच्या तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाखायला मिळाली.

या निवडणुकीत मविआला नेमकं काय भोवलं? ते पाहूया

मविआला काय भोवलं?

अखेरच्या क्षणापर्यंत जागावाटप रखडवल्याचा फटका

काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून मतभेद

सीएमपदाच्या चेहऱ्यावरून उघड मतभेदामुळे चुकीचा संदेश

निधीवरून लाडक्या बहिणीला आधी विरोध नंतर जाहीरनाम्यात घोषणा

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पक्षफुटीला असलेली सहानुभूती संपली.

शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन भांडण सुरु झाले होते. परंतु आता त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. राज्याच्या राजकारणात अशी पहिल्यांदाच स्थिती आली आहे की विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद नसणार आहे. त्याला कारण घटनेतील एक नियम आहे.

विरोधी पक्षनेता नसणार

- विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी त्या पक्षाला एकूण जागांच्या 10 टक्के जागा मिळणे आवश्यक आहे.

- विरोधी पक्षनेतेपदासाठी 28 आमदार पक्षाकडे असावेत

- मविआमध्ये कोणत्याच पक्षाकडे एव्हढं संख्याबळ नाही

- लोकसभेतही 10 वर्ष विरोधी पक्षनेता नव्हते

- कारण या दोन्ही विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नव्हत्या

- 2024च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 99 जागा जिंकल्या. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधी यांना मिळालं.

विधानसभेच्या या दारुण पराभवामुळे मविआला आता भाकरी फिरवायची नाही तर नवीन थापायला लागणार आहे. पराभवाचं आत्मचिंतन करावं लागणार आहे. या निकालानं राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. एव्हढं मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT