Chicken- Mutton Prices Saam Tv
महाराष्ट्र

Chicken- Mutton Prices: श्रावण संपताच चिकन-मटणाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी; नॉनव्हेजचे दरही वाढले, पाहा...

Priya More

Chicken- Mutton Price after Shravan: श्रावण महिना संपाताच चिकन, मटण आणि माश्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक जण मासांहार खात नाही. त्यामुळे चिकन, मटण आणि माश्यांचे दर कमी झाले होते. पण आता श्रावण महिना संपला त्यानंतर आता खवय्यांनी मटन, चिकनच्या दुकानावर मोठी गर्दी केली आहे. चिकन, मटणच्या दरामध्ये किती रुपयांनी वाढ झाली हे आपण पाहणार आहोत....

मिळालेल्या माहितीनुसार, पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्याने आज नागपूरात लाखो रुपयांची मटण, चिकनची विक्री होणार आहे. श्रावण महिना संपल्याने पोळ्याचा पाडवा मांसाहार प्रेमींसाठी पर्वणी असतो. शहरातील विविध मटण मार्केटमध्ये मटण, चिकन खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मटण-चिकनच्या शॉपबाहेर नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाडव्याच्या निमित्ताने हैद्राबाद, मध्यप्रदेशातून बोकड आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

मटण, चिकन विक्रीने आज नागपूरच्या बाजारात मोठी उलाढाल होणार आहे. आज मटण 750 रुपये प्रती किलो दराने विकले जात आहे. गावरण कोंबडी 700 रुपये प्रति किलो तर बॉयलर, कोक्रेल कोंबडी 220 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. श्रावण संपल्यानंतर आता मटण, चिकनच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे.

नागपूरातील दर -

- गावरण कोंबडी - ७०० रुपये किलो

- बॉयलर कोंबडी - २२० रुपये किलो

- मटण - ७५० रुपये किलो

मुंबईतील दर -

- जिवंत कोंबडी - 178 रुपये किलो

- चिकन - 200 रुपये किलो

- मटण - 780 रुपये किलो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drone Terror : मराठवाड्यात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनचं गुढ उलगडलं; पोलिसांचा खळबळजनक खुलासा

Gujrat Road Accident: मोठी दुर्घटना! डिवायडर तोडून भरधाव बसची वाहनांना धडक; चार चिमुकल्यांसह ७ जण ठार

PM Narendra Modi : विधानसभेच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; PM मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹11000 कोटीचं 'गिफ्ट'

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

SCROLL FOR NEXT