Sunday Special : रविवारी जेवणात करा ढाबा स्टाईल झणझणीत 'शेव रस्सा', चिकन विसरून जाल

Shev Bhaji Recipe : पावसाळ्यात रविवारचा बेत कायम स्पेशल असतो. आपल्याला चटपटीत खावंसं वाटू लागतं. अशात तुम्ही घरीच ढाबा स्टाईल झणझणीत 'शेव रस्सा' बनवा आणि रविवारची मेजवानी करा.
Shev Bhaji Recipe
Sunday SpecialSAAM TV
Published On

रोजच जेवण खाऊन कंटाळा आलाय? पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खाण्याचा मोह होत आहे. तर खानदेशी पद्धतीची शेव रस्सा भाजी बनवा. चिकन, मटण देखील तुम्ही विसरून जाल. एवढी झणझणीत भाजी बनेल. शेव रस्सा भाजीही पारंपारिक पदार्थ आहे. सहज, सोपी रेसिपी जाणून घ्या.

झणझणीत शेव रस्सा रेसिपी

साहित्य

  • कांदा

  • लसूण

  • आलं

  • तिखट शेव

  • सुक खोबरं

  • कोथिंबीर

  • हिरव्या मिरची

  • तेल

  • पाणी

  • मसाले (काळा मसाला, गरम मसाला, लाल तिखट, तमालपत्र, वेलची, दालचिनी, हळद, जिरे, लवंग)

Shev Bhaji Recipe
Paratha Recipe : पराठा एक चव अनेक! मुलांच्या डब्यासाठी झटपट बनणारा पौष्टिक पदार्थ, पटकन नोट करा रेसिपी

कृती

झणझणीत शेव रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कांदा आणि सुक खोबरं छान भाजून घ्यावे. त्यानंतर दोन्ही गोष्टी थंड झाल्यावर कांदा कापून घ्यावा आणि खोबरं बारीक कापून घ्यावे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, आले हिरवी मिरची आणि सर्व मसाले टाकून थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यावी.

आता दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यामध्ये हळद, जिरे टाकून बनवलेली पेस्ट घालून मिश्रण छान परतून घ्यावे. भाजीला छान तेल सुटू लागल्यावर अर्धा कप पाणी टाकून उकळी येऊ द्यावी. शेवटी यावरती कोथिंबीरने सजावट करा. आता एका बाऊलमध्ये ही भाजी घेऊन त्यावरती तिखट शेव टाकावा. भाकरी आणि गरमागरम चपातीसोबत या मसालेदार भाजीचा आस्वाद घ्यावा.

Shev Bhaji Recipe
Monsoon Special : पावसाळ्यात चायनिज खाण्याचे क्रेव्हिंग घरबसल्या होईल पूर्ण, डिनरला बनवा रेस्टॉरंट स्टाइल नूडल्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com