Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv

Pandharpur News : विठुरायाला ८ लाखाचा सोन्याचा हार; हैद्राबाद येथील महिला भाविकाकडून अर्पण

Pandharpur news : पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर बंद असले तरी लाखो भाविक मुख दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी करत आहेत.
Published on

पंढरपूर : विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद असले तरी देणग्यांचा ओघ मात्र सुरूच आहे. या दरम्यान हैद्राबाद येथील एका महिला भाविकाने सुमारे ८ लाख रूपये किंमतीचा सोन्याचा तीन पदरी हार विठुरायाला अर्पण केला आहे. हैदराबाद येथील विजया नायडू असे या विठ्ठल भक्ताचे नाव आहे.

Pandharpur News
Bhandara News : कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांने संपविले जीवन

विजया नायडू या निःसीम विठ्ठल भक्त आहेत. त्या नेहमीच पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे (Vithal Rukmini Mandir) संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर बंद असले तरी लाखो भाविक मुख दर्शनासाठी (Pandharpur) पंढरपुरात गर्दी करत आहेत. त्याचबरोबर भाविकांकडून देणग्यांचा ओघही तितकाच सुरू आहे.

Pandharpur News
Sambhajinagar News : मराठा आरक्षण मिळत नाही, डोक्यावर कर्ज; चिठ्ठी लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

मुख दर्शन बंद असले तरी नायडू या आज विठ्ठल रुक्मिणीच्या मुखदर्शनासाठी सहकुटुंब पंढरीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी आठ लाख ३६ हजार रुपये किमतीचा १३० ग्रॅम वजनाच्या सोन्याचा तीन पदरी हार विठुरायाला अर्पण केला. यावेळी (Vitthal Mandir) विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते भाविक विजया नायडू यांना देवाचे उपरणे व दैनंदिनी डायरी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com