Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad News : मॉक ड्रिलमध्ये मुस्लिम दहशतवादी दाखवू नये, गृह मंत्रालय, पोलीस महासंचालकांना नोटीस

Marathwada News : मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद ओसामा अब्दुल कदीर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Aurangabad Latest News : पोलिसांकडून करण्यात आलेल्या मॉक ड्रिलमध्ये मुस्लिमद्वेष पसरवण्याचे चित्र निर्माण केल्याप्रकरणी दाखल फौजदारी जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी औरंगाबाद खंडपीठाने गृहमंत्रालय, पोलिस महासंचालक आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत विशेष समुदायातील संबंधित व्यक्तीचे दहशतवादी म्हणून चित्रण दाखविण्यास कोणतेही मॉकड्रिल केले जाणार नाही, असे प्रतिबंधित आदेशही दिले आहेत. पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. याप्रकरणी मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद ओसामा अब्दुल कदीर यांनी औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

याचिकेनुसार काही दिवसांपूर्वी अहमदनगर आणि चंद्रपूर (Chandrapur) पोलिसांचे दहशतवादीपकडण्यासाठी करण्यात आलेले मॉकड्रिल वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विशेष करून अहमदनगर बसस्थानकात करण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये अतिरेकी भूमिकेतील व्यक्ती "नारे तकबीर अल्लाहू अकबर'च्या घोषणा देत होता.

या घटनेच चित्रीकरण समाजमाध्यमामध्ये पसरले. संबंधित चित्रीकरण पाहिल्यानंतर अतिरेकी हा मुस्लिम समाजाचाच असतो हा गैरसमज लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी जाणूनबुजून दाखविले गेले होते. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मुद्दाम मुस्लिमांना दहशतवादी म्हणून दाखवणे हे स्पष्टपणे पोलिसांचा मुस्लिम द्वेष व समाजाविरुद्धचा पक्षपातीपणा दर्शवते आणि दहशतवाद्यांचा धर्म असल्याचा संदेश जातो.

पोलिसांचे हे बेकायदेशीर कृत्य एखाद्या व्यक्तीला सन्मानाने जगण्याच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करते, तसेच देशाच्या अखंडतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करणारे असून, पोलिसांच्या अशा कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या विश्वासाला तडा जातो. त्यामुळे यातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT