Sangli News Saam v
महाराष्ट्र

Sangli News : मिरजेत रेकॉर्डवरील गुन्हेगारावर खुनी हल्ला; पोलिसांनी ४ संशयीताना घेतले ताब्यात

याबाबतचा अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.

विजय पाटील

Sangli Crime News : मिरजेतील समतानगर जवळ रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पूर्ववैमनस्यातून तलवार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

तर इस्माईल सलीम मुजावर वय 25 रा वेअरहाऊस जवळ समतानगर मिरज असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत मिरज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले असून पोलिसांनी (Police) चार संशयीताना ताब्यात घेतले आहे.

जखमी इस्माईल मुजावर हा सेंटरिंगचे काम करतो. त्याच्यावर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. तो मूळचा कुपवाड या ठिकाणचा असून आई, वडील आणि भावासोबत काही दिवसांपूर्वी मिरजेत भाड्याच्या घरात राहत होता. रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्याच्या घरात घुसून पूर्ववैमनस्यावरून धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबतचा अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय वर्तुळात खळबळ! मराठा आंदोलकांचा लक्ष्मण हाकेंवर हल्ला, सोलापुरातील हॉटेलमध्ये नक्की काय घडलं?

Diabetes Symptoms: डोळ्यांमध्ये दिसायला लागलेत 'हे' बदल? डायबिटीजचा इशारा असू शकतो, चुकूनही दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: सव्वा महिन्यापासून पाऊस गायब; पिकं सुकली, खरीप हंगाम धोक्यात! वाशिममध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली

Acidity : गॅस अन् ॲसिडीटीवर 'हे' १ फळ गुणकारी, पोटाला मिळेल झटपट आराम

सावधान! अचानक अंग थंड पडतंय अन् घाम येतोय? 'हार्ट अटॅक' येण्याआधी शरीर देतं हे ७ संकेत; वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT