शेतात कामाला गेलेल्या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून... Saam Tv
महाराष्ट्र

शेतात कामाला गेलेल्या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून...

दागिनेच्या मोहापायी अज्ञात चोरट्याने Theft हा प्रकार केला असावा असा संशय व्यक्त होत आहे.

संजय जाधव

बुलढाणा - लोणार Lonar तालुक्यातील भुमराळा येथील शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेचा गळा दाबून निर्घृण खून Murder केल्याची घटना भुमराळा येथील गाव शिवारात  घडली आहे. दागिनेच्या मोहापायी अज्ञात चोरट्याने Theft हा प्रकार केला असावा असा संशय व्यक्त होत आहे.

भुमराळा तालुका लोणार येथील वृद्ध महिला कासाबाई नारायण चौधरी वय 65 वर्ष गावालगतच असलेल्या शेतात कामासाठी गेली होती. सदर महिला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. दरम्यान, काही नातेवाईक शेतात शोधत असताना सदर महिलेचा मृतदेह  आढळून आला.

हे देखील पहा -

सदर महिलेच्या अंगावरील दागिने चोरट्यांनी अक्षरशः ओरबडून व कानाचे लचके तोडून बळजबरीने नेले असल्याने दिसून आले. या महिलेच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत या महिलेच्या अंगावर कानातील सोन्याचे रिंग पाच ग्रॅम कानातील सोन्याची फुले एक ग्रॅम हातातील चांदीच्या कडे, पाटल्या, मंगळसूत्र, पोत असे एकूण 56 हजार 500 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

सदर घटनेची फिर्याद मृतक महिलेचा नातू मधुकर दत्ता मोरे याने बिबी पोलीस स्टेशनला दिली असता  पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल.डी तावरे व कर्मचारी दिनेश चव्हाण, अरुण सानप, अर्जुन सांगळे, यशवंत जैयवळ, घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Maharashtra News Live Updates : शरद पवारांना उत्तर देणार....वळसे-पाटील

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

Maharashtra politics :आधी बॅगा आता कारची तपासणी, उद्धव ठाकरेंच्या तपासणीवरुन राजकारण शिगेला

SCROLL FOR NEXT