सांगलीतील जत येथे आर्थिक वादातून एकाचा खून Saam Tv News
महाराष्ट्र

सांगलीतील जत येथे आर्थिक वादातून एकाचा खून

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या जत शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील पशुपैदास केंद्राच्या हद्दीत कॅटल फार्म जवळ म्हशीच्या आर्थिक वादातून एकाचा रात्री धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना घडली आहे. बंदेनमाज उर्फ बंडा मकदूम शेख वय ४० रा. सातारा रोड, मदारी गल्ली जत असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा खून आर्थिक देवाण - घेवाणच्या कारणावरून झाला आहे. याबाबतची फिर्याद मुन्ना मकदुम शेख यांनी पोलिसांत दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जत येथील संशयित आरोपी संतोष हारणे वय २१ याला जतमधील हिवरे येथून रात्री उशिरा अटक केली आहे. (Murder in Sangli financial dispute, police are investigating further)

हे देखील पहा -

बंदेनमाज शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी जत शहरातील संतोष हारणे याला चाळीस हजार किंमतीची म्हशीची विक्री केली होती. या म्हशीला गंभीर आजार असल्याने ती परत शेख यांस परत दिली होती. दरम्यान, यामध्ये हारणे यांनी व्यवहारातील पैसे परत करण्यासाठी शेख यांच्याकडे तगादा लावला होता. यातून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मयत शेख यांनी हारणे यास तीस हजार रुपये देऊन वादाचा विषय मिटविण्यात आला होता. मात्र, लगेचच सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बंदेनमाज उर्फ बंडा शेख यांस कॅटल फार्म येथे हारणे यांनी बोलवून नेले होते. याठिकाणी हारणे याने धारदार शस्त्राने बंदेनमाज उर्फ बंडा शेख याचा खून केला.

ही घटना समजताच जतच्या पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर संशयितांला पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान संशयित बाज - हिवरे परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी हिवरे येथून संशयित संतोष हारणे या तरुणाला अटक केली आहे. ही घटना बुधवारी रात्री उशिरा पोलिसात नोंद झाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT