दोन्ही डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर चे बंधन नको; राज्यांना सूचना

देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे.
दोन्ही डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर चे बंधन नको; राज्यांना सूचना
दोन्ही डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर चे बंधन नको; राज्यांना सूचनाSaam Tv
Published On

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाची Corona दुसरी लाट ओसरल्त असल्याचे चित्र आहे. यामुळे केंद्रासह अनेक राज्यांनी निर्बंधामध्ये restrictions शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन Tourism मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस Dose घेतलेल्या नागरिकांना देशांतर्गत प्रवास करताना RTPCR चाचणी बंधनकारक करु नये, असे मंत्रालयाकडून राज्यांना यावेळी सांगण्यात आले आहे.मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भामध्ये पत्र Letter लिहिले आहे. देशभरात एकच प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले जात आहे.

हे देखील पहा-

टाईम्स ऑफ इंडियाने पर्यटन मंत्रालयाचे अॅडिशनल डायरेक्टर जनरल रुपींदर ब्रार यांच्याद्वारे ही माहिती मिळाली आहे. काही राज्य संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना RT PCR चाचणी शिवाय राज्यामध्ये प्रवेश करु देत आहेत. पण, काही राज्यांत प्रवाशांनी दोन्ही डोस घेतले असले, तरी RT PCR रिपोर्ट दाखवणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. पश्चिम बंगालने Bengal मुंबई, पुणे, चेन्नई, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड Chhattisgarh या राज्यामधून येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही लस घेतले असले तरी देखील RTPCR चा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले आहे. ब्रार म्हणाले की, मंत्रालय सर्व राज्यांना एकच प्रोटोकॉलचे अनुकरण करण्याकरिता सांगत आहे.

दोन्ही डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर चे बंधन नको; राज्यांना सूचना
कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तरीसुद्धा टेस्ट करणे गरजेचे आहे का?

संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्यास बांधिल करु नये, असे सूचवले आहे. पर्यटन आणि सेवा क्षेत्राशी संबंधित संघटनांशी मंत्रालयाने ५ ऑगस्ट दिवशी बैठक घेतली होती. यावेळी नियम शिथिल करण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं आहे. महाराष्ट्र Maharashtra आणि सिक्किम Sikkim यासारख्या राज्यांत देशभरामधून येणाऱ्या प्रवाशांना passengers राज्यात प्रवेश करण्याची मुभा दिली जात आहे.

त्यांनी यावेळी RTPCR रिपोर्ट दाखवणे बंधनकारक राहिलेले नाही. पण त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी एकच प्रोटोकॉल पाळणे आवश्यक राहणार आहे. ब्रार म्हणाले की, आरोग्य आणि नागरी उड्डाण मंत्रालयाबरोबर यासंदर्भात बैठक बोलावली जाणार आहे. एकत्र प्रोटोकॉल कसा राबवता येईल. याबाबत चर्चा केली जाणार आहे. प्रवाशांना अधिक सवलत देण्याचा मंत्रालयचा महत्वाचा उद्देश आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com