Murbad Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Murbad Vidhan Sabha : मुरबाडमध्ये शरद पवार गटाला धक्का; स्थानिक नेत्याचा राजीनामा, टेन्शन वाढणार!

Murbad News : मुरबाड विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला.

अजय दुधाणे

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार शैलेश वडनेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या लोकांना तिकीट मिळत असल्याने राजीनामा देत असल्याचं वडनेरे यांनी म्हटलं आहे.

मुरबाड विधानसभेत (Shiv Sena) शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. यानंतर पक्षाकडून त्यांनाच विधानसभेचे तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित आहे. बाहेरून आलेल्याना तिकीट दिले जात असल्याचे म्हणत इच्छुक असलेले (Badlapur) बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे नाराज झाले आहेत. या नाराजी नात्यातून त्यांनी शरद पवार गटाला राम राम ठोकला आहे. 

अपक्ष लढण्याचा निर्धार 

दरम्यान ज्यावेळी पक्ष अडचणीत होता, त्यावेळी आम्ही तन-मन-धन अर्पून पक्षाचे काम केले आणि लोकसभेला खासदार निवडून आणला. मात्र आज त्याच लोकांना पक्षात घेऊन तिकीट दिले जात आहे. त्यामुळे या गोष्टीचा निषेध करतो; असे म्हणत शैलेश वडनेरे यांनी थेट शहराध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर वडनेरे यांनी अपक्ष लढणार असल्याची भूमिका घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chembur Exit Poll: चेंबूर मतदारसंघातून कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

SCROLL FOR NEXT