Dog Attack Saam tv
महाराष्ट्र

Dog Attack : पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; सहा वर्षीय चिमुकली गंभीर जखमी, मुरबाड तालुक्यातील घटना

Murbad News : मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. प्रामुख्याने शहरात हा त्रास अधिक वाढलेला असून रस्त्यावरून पायी चालणारे तसेच दुचाकी धारकांवर हल्ले करण्याच्या घटना देखील मागील काही दिवसात वाढल्या आहेत

अजय दुधाणे

मुरबाड : मोकाट कुत्र्यांचा वाहनधारक व नागरिकांना होणारा त्रास वाढला आहे. यात पायी चालणाऱ्यांवर मोकाट कुत्र्यांचे हल्ले केल्याची घटना घडत आहे. अशाच प्रकारे मुरबाड तालुक्यातील धसई या गावात एका सहा वर्षाच्या मुलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलीला गंभीर इजा झाली असून कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात तिचा जबडा फाडला आहे.

मुरबाडच्या धसई या गावात झालेल्या घटनेत आरुषी कनोजिया असं जखमी झालेल्या मुलीचे नाव असून ती धसईच्या घोलप गावात राहते. मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. प्रामुख्याने शहरात हा त्रास अधिक वाढलेला असून रस्त्यावरून पायी चालणारे तसेच दुचाकी धारकांवर हल्ले करण्याच्या घटना देखील मागील काही दिवसात वाढल्या आहेत. अशाच प्रकारे मुरबाड तालुक्यात कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

घरात खेळत असताना हल्ला 

गुरुवारी संध्याकाळी आरुषी ही घरात खेळत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला चढवला. यात तिचा जबडा पूर्णपणे फाटला असून कुत्र्याने तिचे अक्षरशः लचके तोडले आहेत. या घटनेनंतर आरुषीला आधी मुरबाडच्या उपजिल्हा रुग्णालय घेऊन नेण्यात आलं. मात्र तिथल्या डॉक्टरांनी तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं. सध्या तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

गावात कुत्र्यांचा धुमाकूळ 

शहरी भागात वाढलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनानंतर ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. शिवाय कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कोणतीही योजना ग्रामीण भागात करण्यात आलेली नाही. याच कारणामुळे धसई परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी यानंतर ग्रामस्थांमधून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton buds in ears: कॉटन बड्सने कान टोकारताय? आताच थांबा, अन्यथा बहिरे व्हाल, वाचा डॉक्टरांनी काय सांगितलं

Maharashtra Live News Update : न्या. सुर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

Dnyanda Ramtirthkar: गुलाबी थंडीत काव्याचं सौंदर्य खुललं अन् चाहते बघतच बसले...

Winter Lips Care: थंडीत कोरड्या अन् फाटलेल्या ओठांची काळजी कशी घ्यावी?

Mumbai Local: मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका, १० ते १२ नवीन लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान

SCROLL FOR NEXT