Tension erupts outside a polling booth in Akola as political workers clash during municipal election voting. 
महाराष्ट्र

Municipal Elections: अकोल्यात नुसता राडा! मतदान केंद्रावर भाजप आणि शिवसेना आमनेसामने, केंद्राबाहेर फ्री स्टाईल हाणामारी

Akola Municipal Election Video: अकोल्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानात गोंधळ उडालाय. भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार मतदान केंद्रात भिडले. दुसऱ्या एका ठिकाणी मतदान केंद्राबाहेर फ्री स्टाईल हाणामारी झालीय.

Bharat Jadhav

  • राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान सुरू

  • अकोल्यातील अनेक मतदान केंद्राबाहेर राडा

  • भाजप-शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र जागोजागी बोगस मतदार,मतदार याद्यांमधे घोळ असल्याचे प्रकार उघडकीस आलेत. तर कुठे कार्यकर्ते आमनेसामने येत त्यांच्या फ्री स्टाईल हाणामारी घडलीय. अकोल्यातही अनेक मतदान केंद्राबाहेर राडा झाला. एका ठिकाणी भाजप-शिंदे गटाचे उमेदवार आमनेसामने आले. दुसऱ्या एका ठिकाणी केंद्राबाहेर काही लोकांमध्ये हाणामारी झाली.

अकोल्यातील हरिहर पेठ भागात भाजप आणि शिंदे गट शिवसेना आमनेसामने आलेत. दोन्ही गटात मतदान केंद्रावरच वाद झाला. महानगर प्रमुख राजेश मिश्रा आणि भाजपचे करण साहू यांच्या गटात वाद झाला आहे. प्रभाग १७ मध्ये शिवाजी विद्यालय मतदान केंद्रासमोर हा प्रकार घडला. मतदान केंद्रा समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलाय. या वादाप्रकरणी शिंदेसेनेचे उमेदवार राजेश मिश्रा म्हणाले की, भाजपचे उमेदवार करण साह हे सकाळपासून आपल्या तीन-चार कार्यकर्त्यांसोबत मतदान केंद्रामध्ये जात होते.

ते मतदान करायला आलेल्या मतदारांना भाजपला मतदान करा असं सांगत होते. सकाळपासून हा प्रकार सुरू होता. जो उमेदवार असेल तो मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतर दूर राहिला पाहिजे. किती वेळ असला पाहिजे, अशी नियम आहेत. दरम्यान मतदान केंद्रात राहण्याचा हा प्रकार सकाळपासून सुरू होता. ही गोष्टी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्दशनात आणून दिला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी जे रिकामे आहेत, त्यांनी बाहेर जावे , असं सांगितलं. त्यावरून त्यांनी वाद सुरू केला.

दुसरीकडे भाजपचे उमेदवार करण साहू म्हणाले, मी उमेदवार आहे. मला वाटतं की, उमेदवाराने सर्व ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. मी चुकीचं काही केलं नाही. तर दुसऱ्या एका ठिकाणी मतदान केंद्राबाहेर काही लोकांमध्ये हाणामारी झाली. मारहाणीतील व्हिडिओमधील लोक काही उमेदवारांचे समर्थक असल्याचे बोलले जातंय. मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांना आणण्यावरून हा वाद झाल्याचे बोलले जातंय. दोन जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यानंतर शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. महापालिकेतील प्रभाग 7 मधील दादासाहेब मेश्राम विद्यालय मतदान केंद्रावरासमोरील हा प्रकार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत भाजपचा महापौर बसणार? महायुती मॅजिक फिगरच्या पार, पाहा एक्झिट पोल, VIDEO

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

Municipal Elections Voting Live updates: वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार, कोल्हापुरात तरुणींचा संताप

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

SCROLL FOR NEXT