Sakshi Sunil Jadhav
सध्या तरुणांमध्ये पांढरे केस होण्याची समस्या वाढलीये. चुकीच्या आहारामुळे त्यांना या समस्येला त्यांना सामोरं जावं लागतंय. आता तुम्ही केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन तुमचे नॅचरल केस टिकवू शकता.
कमी वयातच पांढरे केस हे तणाव, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, हार्मोन्समधील बदल आणि अनियमित जीवनशैलीमुळे होतात.
आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळा पावडर किंवा आवळ्याचा रस नियमित वापरल्याने केस नैसर्गिकरित्या काळे राहतात.
नारळ तेलात कढीपत्ता उकळून ते तेल केसांना लावल्यास केस मजबूत होतात आणि पांढरे होण्याचा वेग कमी होतो.
कांद्याचा रस केसांच्या मुळांवर लावल्याने केसांची वाढ होते आणि नैसर्गिक रंग टिकून राहतो.
मेंदी केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यात कोणतेही हानिकारक केमिकल नसतात.
हिरव्या भाज्या, फळे, सुकेमेवे आणि प्रथिनयुक्त आहार घेतल्याने केसांना आवश्यक पोषण मिळते.
जास्त तणावामुळे केस लवकर पांढरे होतात. योग, ध्यान आणि व्यायाम यामुळे तणाव कमी होतो.
दररोज 7-8 तासांची झोप घेतल्यास शरीर आणि केस दोन्ही निरोगी राहतात. हेअर कलर, डाई आणि केमिकलयुक्त शॅम्पू वापरणं टाळा. यामुळे केस जास्त खराब होऊ शकतात.